भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांना देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन देणार बळ ? केंद्रीय अर्थमंत्री पिंजून काढणार बारामती लोकसभा मतदारसंघ.

विधानसभा निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आता लोकसभेचा निकाल कसा असेल याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यात पक्ष बांधणी मजबूत केल्यामुळे त्याचप्रमाणे इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील व अंकिता पाटील- ठाकरे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुका बळकट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बारामती मतदारसंघात आमदार राहुल कुल,गणेश भेगडे,जालिंदर कामठे,भीमराव तापकीर,शरद ढमाले,वासुदेव काळे,बाळासाहेब गावडे,पांडुरंग कचरे यासारखे दिग्गज नेते आपला उमेदवार निवडून आणण्याच्या तयारीत आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये बारामतीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची पहिल्यापेक्षा अधिक ताकद निर्माण झालेली दिसून येते. भोर, दौंड, खडकवासला, सासवड या तालुक्यातही भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येते. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील हे मजबूत टक्कर देत निवडून येऊ शकतील असे राजकारणातील जानकारांचे मत आहे.कारण गतवेळी २०१९ ला हर्षवर्धन पाटील सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत होते त्यामुळे सुप्रिया सुळे यांना ६ लाख ८६ हजार ७१४ एवढी मते मिळाली होती व कांचन राहुल कुल यांना ५ लाख ३० हजार ९४० एवढी मते मिळाली होती.त्यामुळे आता हा खूप मोठा गॅप आहे असं समजणं चुकीचं होऊ शकते.
ही सर्व पार्श्वभूमी भाजपाने ओळखून भाजपच्या ज्येष्ठ मंत्री म्हणून ओळखल्या जाणा-या निर्मला सीतारामन यांच्यावरच बारामतीची जबाबदारी दिली आहे असे समजते. केंद्रीय अर्थमंत्री बारामती लोकसभा मतदारसंघात येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासोबतच केंद्रीय प्रकल्पांना भेटी देणे, केंद्राच्या लाभार्थ्यांसोबत चर्चा करणे अशा बाबी त्या करणार आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासह ही जागा खेचून आणण्यासाठी वातावरणनिर्मितीचा प्रयत्न होणार आहे. 16 ऑगस्ट रोजी खडकवासला व भोर, 17 ऑगस्ट रोजी इंदापूर व दौंड तर 18 ऑगस्ट रोजी बारामती व सासवड येथे निर्मला सीतारामन येणार आहेत. तसेच बारामती व सासवड येथे त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता इंदापूर सह बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांमधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here