भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांना दुसऱ्यांदा कोरोना लागण, परवाच इंदापूरला येऊन कार्यकर्त्यांच्या घेतल्या होत्या गाठीभेटी

इंदापूर:अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. संदर्भातील माहिती त्यांनी स्वतःच सोशल मीडियावरून दिली. गेल्याच आठवड्यात ते अनेक गर्दीच्या ठिकाणी फिरले होते. खरंतर गेल्याच तीन दिवसांपूर्वी त्यांनी इंदापूर येथील भाजपा युवा कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतलेल्या होत्या.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना कोरोनाची लागण होण्याची ही दुसरी वेळ आहे. सहा महिन्यांपूर्वीही त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवताच त्यांनी स्वतःहून कोरोना चाचणी करून घेतली. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्यांनी विलगीकरणात राहणे पसंत केले आहे.या बाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियावर देताना म्हंटले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी, असे त्यांनी म्हंटले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here