कर्जत:(प्रतिनिधी:महेश सूर्यवंशी): भांबोरा,कर्जत तालुक्यात महत्त्वपूर्ण असणाऱ्या भांबोरा- हिंगणगाव वी.का.से.सोसायटी संचालक निवडणुकी मध्ये नितीन पाटील व सागर लोंढे यांच्या नेतृत्वा खाली सागर लोंढे मित्र मंडळाच्या नियोजना खाली सिद्धेश्वर सहकार विकास पॅनल ने १३ पैकी १३ जागांवर विजय मिळवत २५ वर्षानंतर सत्तांतर घडवून आणले आहे. सोमवारी (दि.२५) १३ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली.या वेळी सर्व ७८० सभासद मतदारानपैकी ७२५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. या नंतर ४ वाजता निवडणूक अधिकाऱ्याने मतमोजणीला सुरुवात केली. सिद्धेश्वर सहकार विकास पॅनलने ६० ते २०० मताधिक्याने विजय मिळवत 25 वर्षे सत्तेत असणाऱ्या दिग्गज नेतेमंडळींचा पराभव केला. विजयी उमेदवार सर्वसाधारण मतदार संघातून नितीन पाटील,महादेव जांभळे, बाळासाहेब होलम,भीमराव लोंढे,अरुण लोंढे,राम रणदिवे,यशवंत चव्हाण,रामचंद्र पुंडे आणि अनुसूचित जाती – जमाती मधून शिवाजी शेटे .महिला राखीव प्रवर्गातून सरस्वती जगताप ,विमल लोंढे. इतर मागास प्रवर्ग – अशोक चव्हाण .भटक्या विमुक्त जातिंकरता अमृत कोरे हे विजयी झाले आहेत. निवडणूक निकालानंतर सर्व विजयी उमेदवारांनी ग्रामदैवत सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. या वेळी बोलताना सर्व सभासदांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला त्याला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न सर्व संचालक करू असे आश्वासन नितीन पाटील यांनी दिले आणि सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.