भांडगाव:दि.8 एप्रिल रोजी पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांडगाव या शाळेत विद्यार्थी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुरुवड केंद्राचे केंद्रप्रमुख गावडे तसेच माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक गायकवाड सर,विद्यमान मुख्याध्यापक सातपुते सर म्हणून लाभले होते.तसेच गावच्या सरपंच पल्लवी भोसले, उपसरपंच अमोल जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आत्माराम जाधव कार्यक्रमासाठी उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले डॉ. नितीन राऊत,डॉ. टी बी घोगरे यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून विद्यार्थ्यांना समुपदेशन केले. तसेच विद्यार्थ्यांचा रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी लॅब केमिस्टर महेश पवार यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांना अल्पोहार देण्यात आला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक रामचंद्र शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव बागल यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरविंद शिंदे,राहुल जगताप व शिला गायकवाड यांनी सहकार्य केले.