इंदापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या भांडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण इंदापूर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे .ही निवडणूक शनिवार दिनांक ४।६।२०२२ रोजी होणार असून दोन दिवसावर ही निवडणूक आली आहे .एकदम चुरशीची अशी ही निवडणूक होणार असून भाजपतर्फे मा. हर्षवर्धनजी पाटील (साहेब) व आप्पासाहेब जगदाळे (साहेब) यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास सहकार पॅनलमध्ये एकदम तगडे उमेदवार उभे आहेत. या पक्षाने पॅनल प्रमुखांची जबाबदारी मच्छिंद्र वीर,दिनकर गायकवाड, अंकुश गायकवाड ,सिद्धेश्वर जाधव, यांच्याकडे सोपवली आहे. आणि राष्ट्रवादी तर्फे गोसावी महाराज शेतकरी विकास पॅनल मध्ये भाजपच्या उमेदवारांना टक्कर देणारी मोठी फौज उभी आहे. राष्ट्रवादी पक्षाची व गोसावी महाराज शेतकरी विकास पॅनल ची जबाबदारी श्री. सुभाष गायकवाड( सर) व श्री. कैलास (आप्पा) शिंदे, देविदास माने ( सर), नानासो ढुके ( मा. चेअमन), शिवाजी गायकवाड, यांच्याकडे आहे.१३ जागेसाठी होणाऱ्या निवणुकीमध्ये १ जागा राष्ट्रवादीची बिनविरोध आलेली आहे, त्यामुळे या निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण झाली असून आज तरी कोण आणि कोणता पॅनेल बाजी मारणार आहे हे कोणाला सांगता येणार नाही ,अशीच परिस्थिती भांडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीची असून ,त्यामुळेच तालुक्यातील सर्वांच्या नजरा या निवडणुकीकडे लागलेल्या आहेत. दोन्ही पक्षातील उमेदवारांचा विचार केला असता दोन्ही पक्षात एकदम तगडे उमेदवार उभे असून सर्वांचाच समाजकार्यात सुद्धा मोठा सहभाग असतो. सर्व उमेदवारांचा जनसंपर्क सर्वांबरोबर तसा जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होईल असा अंदाज वर्तवला जात आहे आणि या निवडणुकींमधील भाजपचे व राष्ट्रवादीचे पॅनल प्रमुखांचे भांडगाव मध्ये चांगलेच वजन आहे. सर्व या पॅनल प्रमुखांचे त्यांच्या सामाजिक कामाच्या जोरावर चांगला ठसा या भांडगाव गावावर असून त्यांना माननारी संख्या मोठी आहे .त्यामुळे कोणाचे पारडे जड आहे हे आत्ताच सांगणे कोणाला शक्य होत नाही. या निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात असून आपापल्या परीने सर्व कार्यकर्ते उमेदवार पॅनल प्रमुख प्रत्येकाच्या घरोघर जाऊन भेटून प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे ही निवडणूक रोमहर्षक होणार असा अंदाज वर्तवला जात आहे .या इंदापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या भांडगाव विविध कार्यकारी सेवा निवडणुकीचा निकाल सुद्धा चार तारखेलाच असून या निवडणुक निकालाची सर्व माहिती जनता एक्सप्रेस मराठी न्युज मार्फत आपणास प्रसारित केली जाईल.
Home Uncategorized भांडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूकीत कोण मारणार बाजी भाजप की...