भांडगाव मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा , विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या घोषणेने भांडगाव दुमदुमले

आज भांडगाव मध्ये स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला . 15 ऑगस्ट 2022 निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी माध्यमिक विद्यालय भांडगाव या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष अशोक भाऊ घोगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .त्यानंतर माध्यमिक विद्यालया पासून ग्रामपंचायत भांडगाव पर्यंत विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली प्रभात फेरीमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घोषणा देण्यात आल्या झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाव बेटी पढाव, स्त्रीभ्रूणहत्या करू नका, भारत माता की जय वंदे मातरम, अशा विद्यार्थ्यांनी केलेल्या घोषणेने भांडगाव दुमदुमून गेले. त्यानंतर ग्रामपंचायत भांडगाव मध्ये सरपंच सौ. अपर्णा जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, ग्रामपंचायत ध्वजारोहण केल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रभात फेरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांडगाव या ठिकाणी आली त्या ठिकाणचे ध्वजारोहण व विविध कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडले, त्यामध्ये प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, व ग्रामस्थ यांची भाषणे झाली. विद्यार्थिनी अतिशय सुंदर आणि खणकर आवाजात देशभक्तीपर भाषणे केली. त्यानंतर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली अतिशय सुंदर आणि नियोजनबद्ध कवायत सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती .त्यानंतर विद्यालयात घेतलेल्या विविध स्पर्धांचे निकाल घोषित करण्यात आले ,अध्यक्षीय भाषणानंतर आभार मानून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले व कार्यक्रमाची सांगता झाली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here