👉 भांडगाव ग्रामपंचायतसाठी सौ. शोभा देविदास माने उपसरपंच पदी विराजमान .
इंदापूर: भांडगाव ग्रामपंचायत मध्ये शोभा देविदास माने यांची एक मताने उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. दत्तात्रय कल्याण ढुके हे या अगोदर उपसरपंच या पदावर कार्यरत होते. परंतु त्यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पदाची जागा रिक्त झाली होती .आज भांडगाव ग्रामपंचायत मध्ये सरपंच सौ अपर्णा पांडुरंग जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शोभा देविदास माने यांची एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक हनुमंत पाटील यांनी काम पाहिले. भांडगाव ग्रामपंचायत ही राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. भांडगाव मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुभाष किसन गायकवाड व कैलास आप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भांडगाव ग्रामपंचायत वर राष्ट्रवादीने ताबा मिळवला आहे. भांडगाव ग्रामपंचायतमध्ये सरपंच आणि उपसरपंच या दोघेही आत्ता महिला झाल्या असून त्यामुळे भांडगाव गावात ही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यांच्या या निवडीबद्दल माजी राज्यमंत्री आमदार दत्तामामा भरणे यांनी शुभेच्छाा दिल्याा आहेत.आज उपसरपंच या पदावर निवड झालेल्या शोभा देविदास माने यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना सांगितले की, “माझ्यावर ग्रामपंचायत सरपंच सौ.अपर्णा जाधव,मा.उपसरंच श्री.दत्तात्रय ढूके, सदस्य श्री. गायकवाड सर, सौ.पल्लवी भोसले,अमोल जाधव, सौ.उज्वला परकाळे, सौ.कांता गायकवाड,सौ.रुपाली गायकवाड व गावातील ग्रामस्थांनी विश्वास देऊन उपसरपंचपदाची जबाबदारी दिल्यामुळे मी समाधानी आहे. मला गावासाठी खूप काही करून दाखवायचे आहे. गावाचा विकास करायचा आहे .तसे मला पहिल्यापासूनच सामाजिक कामाची आवड होती, आपण काहीतरी गावासाठी, समाजासाठी, गावातील गोरगरीब जनतेसाठी करून दाखवावे अशी माझी इच्छा होती. आणि मला घरच्यांचा सुद्धा खूप त्यासाठी पाठिंबा होता”पुढे त्या म्हणाल्या की माझे पती देवीदास माने यांनी मला पाठिंबा देऊन आणि माझ्या मनातील गावाच्या विकासाचे स्वप्न पाहून मला ग्रामपंचायत निवडणूकसाठी उभे केले. आणि आमचा राष्ट्रवादीचा पॅनल आणि मी भरघोस मतांनी निवडून आले, सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून उपसरपंच पदाची धुरा माझ्या हातामध्ये दिली .त्यामुळे मी नक्कीच गावाच्या विकासासाठी गोरगरीब जनतेसाठी जेवढे मला करता येईल तेवढे मी योगदान देईल .सर्वसामान्य लोकांच्या गोरगरीब जनतेच्या अडचणी समजून घेऊन सोडवण्याचाही प्रयत्न करीन.”अशा भावना जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना उपसरपंच सौ. शोभा देविदास माने यांनी व्यक्त केल्या. जनता एक्सप्रेस मराठी न्यूज कडून शोभा देविदास माने उपसरपंच भांडगाव यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.