भांडगावमध्ये तालुकास्तरीय शालेय स्पर्धेच्या उद्घाटनास खा.सुप्रियाताई सुळे उपस्थित राहणार.

माध्यमिक विद्यालय भांडगाव तालुका इंदापूर व शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शासकीय शालेय खो_खो स्पर्धेचे आयोजन सोमवार दि. 11 सप्टेंबर 2023 ते बुधवार दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी केले आहे. या स्पर्धेच्या भव्य उद्घाटन समारंभास उद्घाटक म्हणून खा.सुप्रियाताई सुळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष  अशोक भाऊ घोगरे (अध्यक्ष भैरवनाथ ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित माध्यमिक विद्यालय भांडगाव) हे देखील उपस्थित असणार आहेत. या तालुकास्तरीय शासकीय शालेय खो-खो स्पर्धेमध्ये मुले व मुली वयोगट 14, 17, 19 यांच्यामध्ये ही स्पर्धा चुरशीची पहावयास मिळणार आहे.उद्घाटन समारंभास प्रमुख उपस्थितीमध्ये बाळासाहेब घोलप ( मा. जिल्हा परिषद सदस्य) प्रवीण भैय्या माने (मा. सभापती आरोग्य व बांधकाम विभाग) , श्रीमती. छायाताई पडसळकर (अध्यक्ष महिला रा. काँ. इंदापूर) , डॉ. शशिकांत तरंगे (सामाजिक कार्यकर्ते) , महादेव कसगावडे (जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे) , महेश चावले (क्रीडा अधिकारी इंदापूर) , अजिंक्य खरात (गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती इंदापूर) , शरद झोळ (अध्यक्ष तालुका क्रीडा शिक्षक संघटना) तसेच सर्व संचालक मंडळ सरपंच उपसरपंच सदस्य विविध सर्व संस्थेचे पदाधिकारी पालक भांडगाव मधील सर्व ग्रामस्थ उपस्थित असणार आहेत तरी या भव्य उद्घाटन समारंभास भांडगाव पंचक्रोशीतील सर्वांनी उपस्थित राहावे असे माध्यमिक विद्यालय भांडगावचे मुख्याध्यापक गायकवाड सर यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्युज तर्फे सर्वांना आवाहन केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here