आज भांडगाव मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत भांडगाव ग्रामपंचायत व माध्यमिक विद्यालय भांडगाव यांनी आज गुरुवार दिनांक 11 ऑगस्ट 2022 रोजी खंडोबा मंदिर भांडगाव येथे भांडगाव गावचा शंभर वर्षांपूर्वीचा इतिहास व सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयावर कार्यक्रम आयोजित केला.या कार्यक्रमास भांडगाव मधील बहुसंख्य लोक उपस्थित होते .सदरचा कार्यक्रम सरपंच ग्रामपंचायत भांडगाव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सुरुवातीला आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर प्रास्ताविक सुभाष गायकवाड सर यांनी केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाविषयी ग्रामपंचायत भांडगाव राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. गावचा शंभर वर्षांपूर्वी चा इतिहास गावचे ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते शिवाजी (आप्पा) गरड यांनी सांगितला. शंभर वर्षांपूर्वीचा इतिहास सांगताना त्यांनी अनेक पूर्वीचे प्रसंग व घटना सविस्तर सांगितल्या ज्या आजच्या पिढीला प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतील. या कार्यक्रमासाठी लहान मुलांची उपस्थिती सुद्धा मोठ्या प्रमाणावर होती गावचा इतिहास ऐकताना लहान मुले शांतपणे एकाग्र होऊन इतिहास ऐकत होती. त्यानंतर सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयावर कृषी विभागाचे कृषी सहाय्यक श्री कदम साहेब यांनी रासायनिक खते व औषधे यांच्या अतिवापरामुळे जमिनीचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे जमीन नापिकी होत चालली आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करताना सेंद्रिय शेती म्हणजे काय, ती का करायची, व कशी करायची याविषयी वेगवेगळे दाखले व उदाहरणे देऊन या कार्यक्रमात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, सोसायटी सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच परिसरातील अनेक शेतकरी व तरुण वर्ग उपस्थित होता. उपस्थितांचे आभार देविदास माने सर यांनी मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गायकवाड व दत्तात्रय जाधव यांनी केले.