शेतकऱ्यांनी आपल्या शेताजवळील ओढे नाले यावर रासायनिक खते किंवा सिमेंटच्या रिकाम्या गोण्या वापरून वनराई बंधारे बांधावेत असे आवाहन इंदापूर तालुका कृषी अधिकारी श्री .भाऊसाहेब रुपनवर व मंडळ कृषी अधिकारी गणेश सूर्यवंशी यांनी सर्व शेतकरी बांधवांना केले आहे.दुष्काळी परिस्थितीत शेतकरी पावसाची चातक पक्षासारखी वाट पाहत असतो, खरीप हंगामातील पिके पक्व होण्यास आलेली आहेत या अवस्थेत पिकांना पाणी आवश्यक असते, बाजरी ,मका या पिकांना दाणे भरण्याची अवस्थेत पाणी गरजेचे असताना पावसाने दडी मारली आहे .इंदापूर तालुक्यात ही सरासरी पर्जन्यमानाचे 50 टक्के पाऊस झालेला आहे. रब्बी हंगामात ज्वारी मका पेरणीचा कालावधी आलेला आहे पण तरीही पाऊस पुरेसा न पडल्यामुळे पाण्याची परिस्थिती बिकट झालेली आहे अशा परिस्थितीत खरीप हंगामातील पिकांना सुरक्षित पाणी देण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी इंदापूर यांच्यावतीने वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. भाटनिमगाव , अवसरी रस्त्यावरील गायकवाड यांच्या शेताजवळील ओढ्यावर मंडल कृषी अधिकारी बावडा मार्गदर्शनाखाली श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. हा बंधारा बांधल्यामुळे ओढ्यातील वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत मुरण्यास मदत होणार आहे .परिसरातील विहिरींना पाणी वाढण्यास मदत होणार आहे. मंडल कृषी अधिकारी गणेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची धडक मोहीम हाती घेऊन भाटनिमगाव , झगडेवाडी, सराफवाडी ,चाकाटी येथे बंधारे बांधण्यात आले आहेत. वनराई बंधारा बांधण्याची नियोजन अण्णा कदम कृषी सहाय्यक वकील वस्ती यांनी केले, तसेच यावेळी अतुल जावळे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक कल्याण पांढरे व कृषी अधिकारी गणेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेऊन बंधारे बांधले आहेत, असेच नियोजन गावोगावी करून जास्तीत जास्त बंधारे बांधण्यात येणार आहेत अशी माहिती कृषी अधिकारी गणेश सूर्यवंशी यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना दिली.
Home Uncategorized “भविष्यात शेतीसाठी पाणीटंचाई टाळण्याकरिता शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त वनराई बंधारे बांधावेत”-मंडळ कृषी अधिकारी...