बावडा: श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालययामध्ये दिनांक 6 जानेवारी 2022 रोजी ज्यूनियर मधील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आलेली होती.सकाळी ठीक 9.00 वाजता लसीकरणाला सुरुवात झाली छोट्याशा कार्यक्रमात प्रथम आरोग्य विभागातील डॉक्टर व कर्मचारी यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. त्यानंतर आमचे सर्वांचे मार्गदर्शक व नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदरणीय उदयसिंह पाटीलसो यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये शिक्षकांनी 9 वी ते 12 वी चा दररोज एक ते दोन तास जादा घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी अभ्यासक्रम पूर्ण करावा. कारण कोरोनाची स्थिती भविष्यकाळात कशी असेल याविषयी काहीही सांगता येणार नाही असे उद्गार काढले त्यानंतर उद्घाटन करून लसीकरण सुरु करण्यास सांगितले. आरोग्य अधिकारी यांनीही लशी संदर्भात माहिती दिली. प्रास्ताविक प्राचार्य श्री घोगरे सर यांनी केले व सूत्रसंचालन श्री मुलांणी सर यांनी केले या कार्यक्रमात कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व अध्यापक अध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते त्याच बरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र बावडा याठिकाणचा सर्व स्टाफ उपस्थित होता. लसीकरणाचा कार्यक्रम सायंकाळी तीन वाजेपर्यंत सुरू होता.