बोरी (प्रतिनिधी: प्रवीण पिसे)-मौजे बोरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष कै. भगवान जगन्नाथ ठोंबरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने दि. 12/3/2023 रोजी इंदापूर तालुक्याचे आमदार मा.श्री.दत्तात्रय मामा भरणे आवर्जून उपस्थित राहिले.यावेळी ह.भ.प. श्री.संतोष महाराज काळे सणसर यांची किर्तन सेवा आयोजित केली होती.पुष्पवृष्टी झाल्यानंतर आदरणीय आमदार श्री.दत्तात्रय मामा भरणे अतिशय भावूक झालेले दिसून आले मनोगता दरम्यान भरणे मामांनी कै. भगवान जगन्नाथ ठोंबरे यांच्या कार्यकर्तुत्वाचा उल्लेख आवर्जून केला.श्री भरणे मामा बोलत असताना समस्त बोरीकर जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. यावेळी गावातील सर्व नेते मंडळींनी कै.भगवान ठोंबरे यांच्या पुणे येथे उच्च शिक्षण घेत असलेल्या चि. आविष्कार याच्या शिक्षणास मदत करण्याची मागणी केली.
कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीच्या मागणीवर आदरणीय आमदार श्री.भरणे मामांनी तत्परतेने एक लाख रूपयांचा मदतीचा धनादेश चि.आविष्कार यांस सुपूर्द केला.”भविष्यात शिक्षणाबाबत कोणतीही अडचण आली तर त्यासाठी मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे” असेही श्री.भरणे मामा यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या कै.भगवान जगन्नाथ ठोंबरे यांचे चि. अविष्कार यास सांगितले.
याच दरम्यान बेलवाडी येथील दूधगंगा संघाचे माजी चेअरमन श्री.शहाजी अण्णा शिंदे यांनीही आपल्या प्रिय मित्राच्या मुलाच्या शिक्षणास मदत म्हणून 51000/ रुपये मदत देऊन मैत्रीचा धागा गुंफला.
यावेळी उपस्थित सर्व बोरीकरांनी कै. भगवान ठोंबरे यांना पुष्पवृष्टी अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.