सोलापूर(विशेष प्रतिनिधी : सविता आंधळकर): 20 वर्षीय तरुणाच्या मृतदेहाला अक्षरश : मुंग्या लागल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलीय .रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोपदेखील मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केलाय . मात्र हा आरोप रुग्णालय प्रशासनाद्वारे फेटाळून लावण्यात आला आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की , सोलापुरातील बुधवार पेठ येथील राकेश मोरे या 20 वर्षीय युवकावर 8 फेब्रुवारी पासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये टीबी या आजारावर सुरू होते. काल दुपारी साडेतीनच्या सुमारास उपचारा दरम्यान राकेश याचा मृत्यू झाला .मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेल्या नंतर नातेवाईकांना मृत राकेशच्या शरीराला मुंग्या लागल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आला . राकेशला लावण्यात आलेल्या ऑक्सिजन मास्कलाही मुंग्या लागल्या होत्या . त्यामुळे राकेशच्या मृत्यूस हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप राकेशच्या नातेवाईकांनी केला आहे .मात्र उपचारामध्ये कोणताही हलगर्जीपणा झाला नसून मृत्युपुर्वी रुग्न गंभीर असल्याची कल्पना नातेवाईकांना देण्यात आली होती. रुग्णाला नाकाद्वारे दूध दिले जात होते .त्याचबरोबर सलाइनमध्ये देखील साखरेचे प्रमाण असते त्यामुळे मुंग्या लागल्याचे मत हॉस्पिटलमधुन स्पष्ट केले जात आहे.तसेच मृत्यू झाल्याचे सांगितल्यानंतर गाडी आणण्याचे कारण सांगून नातेवाईक निघून गेले आणि संध्याकाळपर्यंत मृतदेह हा जनरल वार्डातच होता. नातेवाईकांनी येण्यास उशीर केल्याने तसेच काही प्रमाणात अस्वच्छता असल्याने हा प्रकार घडला असल्याची शक्यता असल्याचे स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनाने दिले आहे .एकंदरीत ही खूप दु:खद घटना असुन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल . तसेच यापुढे रुग्णाचा मृतदेह हा अर्ध्या तासापेक्षा जास्तकाळ वार्डात राहणार नाही , याची खबरदारी घेतली जाईल , असे स्पष्टीकरण प्रभारी अधिष्ठाता डॉ . शाकिरा सावस्कर यांनी दिली .
Home सोलापूर शहर भयानक प्रकार ? सोलापुरातील शासकीय रुग्णालयातील मृतदेहाला लागल्या मुंग्या.मृत्युही झाला पोरका