भक्तिमय वातावरणात बावडा गावी पहिल्यांदाच संत श्रीपादबाबा संत रामदास बाबा पालखीचा रिंगण सोहळा रंगला..

👉 माजी सभापती मयूरसिंह पाटील यांच्या हस्ते मानाच्या पादुकांचे पूजन
इंदापूर(प्रतिनिधी): क्षेत्र भांबर्डे(ता.शिरूर) येथील संत श्रीपादबाबा व संत रामदास बाबा पालखी सोहळा(बुधवार ता.६ जुलै) रोजी इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांच्या अनुराधा निवासस्थानी देवराज आश्वाचा गोल रिंगण सोहळा हरिनामाच्या गजरात पार पडला.
        ! ऐंसे संत ऐसी हरीचे दास !
        ! ऐसा नाम घोष सांगा कोठे !
विणेकरी,तुळशीवाल्या भगिनी,देवराज नावाचा अश्व, झेंडेकरी यांनी दुपारच्या सत्रात अनुराधा निवासस्थानासमोरील प्रांगणात पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकाराम या गजरात रिंगण सोहळ्याला गोल वेडा पूर्ण केला. पहिल्यांदाच बावडा गावी रिंगन सोहळा रंगला, आश्वाचे व विश्वस्ताचे पूजन,विनेकाऱ्यांचे पूजन इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.चाललेल्या हरीचा नामाचा घोष चोपदार विणेकरी,पखवाजे व अश्व यांनी काही क्षणाचा विलंब न लावता रिंगण सोहळा पार पाडला.यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते,मराठी पत्रकार संघाचे राजेंद्र कवडे देशमुख,पत्रकार संघाचे मुख्य सचिव सागर शिंदे,तालुका उपाध्यक्ष संदीप सुतार,कार्यकारणी प्रमुख श्रेयश नलवडे,तात्याराम पवार,शिवकुमार गुणवरे, संतोष तावरे,सचिन चौगुले यांचा सन्मान पालखी सोहळ्याच्या वतीने सोहळा प्रमुखांनी केला.ह.भ.प.दयानंद महाराज पवार, माऊली महाराज पवार,भागवत महाराज रिंगणे,(शेगाव ),अविनाश महाराज अनोसे,मृदंगाचार्य रामहरी महाराज उगले,ऋषिकेश नागरगोजे,बाळू महाराज चौगुले,रमेश महाराज त्रिकुंडे,कृष्ण महाराज गिरी,कृष्ण महाराज फुलजळके, रवींद्र लांडे,गंगाधर गिरी,जिजाबा अण्णा पवार, चोपदार महादेव हळे,नारायण काळे,सचिन जगदाळे,राजाराम पवार व मळाईदेवी वारकरी शिक्षण संस्था आजी माजी विद्यार्थी यांनी रिंगण सोहळा पुर्ण करण्यासाठी यशस्वी परिश्रम घेतले.
तसेच ह.भ.प.शैलाताई टाकळकर,रुपाली चौगुले,उज्ज्वला गणगे,प्रतिज्ञा पटाईत,आरती कोळपे,अश्विनी गिरे,ज्ञानेश्वरी बोराटे, उज्वला मोहळकर,उज्वला खेडकर,आशाताई निर्मळ,रुपाली बोराटे,ज्योती मोहळकर,सुवर्णा चव्हाण,रघुनाथ जगताप यांच्यासह मानाचे वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अकलूज येथे पुढील मुक्कामासाठी पालखी सोहळा साडेतीन वाजण्याच्या सुमारास मार्गस्थ झाला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here