(वैभव पाटील : प्रतिनिधी)-बंधुभाव वाढावा, प्रतिभावंत खेळाडूंचा शोध घेता यावा, कला, क्रीडा व संस्कृतीने नटलेल्या आपल्या महोत्सवातून प्रेरणा घेऊन येणारी पिढी घडावी या उदात्त हेतूने भंडारी कला क्रीडा मंचाकडून भंडारी क्रीडा महोत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे जगभरात लॉकडाऊन पाळण्यात आला होता. त्यामुळे सर्वच गोष्टींवर बंधने होती. आता त्यातून बाहेर पडल्यावर भंडारी कला क्रीडा मंचाकडून भंडारी क्रीडा महोत्सवा मार्फत प्रथमच विद्यार्थी, पुरुष आणि महिलांकरिता एकूण सोळा प्रकारच्या मैदानी खेळांचे तीन दिवसीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. अशा भव्य दिव्य देखण्या कार्यक्रमाचे उदघाटन मा. राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा, अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश शाह, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुजित पाटील, पालघर नगराध्यक्षा उज्वला काळे, शिवसेना तालुका प्रमुख विकास मोरे, मनसेचे पालघर शहर अध्यक्ष सुनिल राऊत, भाजपचे शहर अध्यक्ष अरुण माने, मनसे विध्यार्थीसेना लोकसभा अध्यक्ष धीरज गावड, मोरे भंडारी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष शशिकांत ठाकूर, नवनीत पाटील, शिरगांव सरपंच चिन्मयी मोरे, उपसरपंच इमरान दांडेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.भंडारी कला क्रीडा मंच आयोजित भंडारी क्रीडा महोत्सव २०२२ मध्ये पहिल्या दिवशी सहभागी झालेल्या खेळाडूंना आयोजकांमार्फत नीटनेटकी सोय आणि स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच समाजातील व्यावसायिक बांधवांनी देखील विविध खाद्य पदार्थाचे स्टॉल उपलब्ध केले होते. अशा प्रकारे क्रीडा महोत्सवाचे यशस्वी आयोजनासाठी भंडारी कला क्रीडा मंचाचे अध्यक्ष सुजित पाटील, कार्याध्यक्ष युती मोरे, खजिनदार शरद मोरे, उपाध्यक्ष सुनिल राऊत, हरिश्चंद्र पाटील, भावेश मोरे, सचिव दिपक भंडारी, संयम मोरे, चिटणीस भावेश मोरे, प्रणय राऊत, संगीता मोरे, प्रिती मोरे यांनी अथक परिश्रम घेतले.