ब्रेकिग न्यूज : इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ‘ या ‘तारखेला होणार परीक्षा.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा बाबतीत संभ्रम दूर झाला असून या नियमित मूल्यमापन पद्धतीने ऑफलाइनच होणार असल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. दहावीच्या परीक्षा 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 दरम्यान पार पडणार आहेत. त्यासोबत बारावीच्या लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 दरम्यान पार पडणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन या परीक्षा नियमित पद्धतीने होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे .तसेच इयत्ता बारावी चा निकाल जून 2022 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि दहावीचा निकाल जुलै 2022 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहील. दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर कधी होणार याची प्रतीक्षा दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना लागली होती. त्या तारखा आज जाहीर झाले आहेत. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थी अनेक परीक्षांना मुकले होते यंदा तरी परीक्षा होणार का, या संभ्रमात सगळे विद्यार्थी होते असा सवाल सगळ्या विद्यार्थ्यांना पडला होता, याबाबत वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत आज दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या, त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ उपलब्ध होणार आहे. 14 फेब्रुवारी ते 3 मार्च पर्यंत बारावीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत. आणि 25 फेब्रुवारी ते 14 मार्च दहावीची तोंडी परीक्षा होणार आहेत .ओमिक्राॅन संदर्भात राज्यशासन खबरदारी घेत आहे. याबाबत राज्य सरकारने काही नियम लागू केले आहेत.या नियमांचे पालन करून दहावी आणि बारावीचे परीक्षा पार पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना घाबरून जाण्याचे कारण नाही असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले आहे .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here