बोरी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी राहुल पाटील यांची निवड.

गेल्या मंगळवारी बोरी शाळा व्यवस्थापन समितीच्या पालक मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते. या मीटिंगमध्ये सर्वानुमते शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून राहुल शरद पाटील सर्वानुमते निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्ष अश्विनी मयूर गावडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.शाळेसाठी लागणाऱ्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा व विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी ज्यादा प्रयत्न आम्ही करणार आहोत असे नवनिर्वाचित अध्यक्ष पाटील यांनी सांगितले .याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांचे पालक,शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक चक्रपाणी लेंढे यांनी सर्वांचे स्वागत केले व आभारही मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here