जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, दौड प्रतिनिधी
अजय तोडकर मो.7776027968
दौड:दौड तालुक्यातील मौजे बोरीऐंदी गावातील शेतकरी रघुनाथ बंडू शेंडकर व त्यांचे चिरंजीव सिव्हिल इंजिनियर कु. किरण रघुनाथ शेंडकर या शेतकऱ्यांनी अर्धा एकर क्षेत्रामध्ये अवघ्या वीस ते बावीस दिवसांमध्ये मेथी या भाजीच्या उत्पन्नातून चक्क एक लाख रुपये मिळवले आहेत. शेती व्यवसाय करणाऱ्यांवर वेळो वेळी आस्मानी संकटाला सामोरे जाऊन पिकाची नुकसान होऊन शेतकरी नेहमीच डबघाईस येतो परंतु सगळ्याच पिकात उत्पन्न मिळत नाहीत. बाजार मार्केट कमी जास्त-होत असते कधी कोणत्या पिकांची बाजार मार्केटमध्ये चढ उतार होईल हे सांगता येत नाही. बोरीऐंदी गावातील शेती व्यवसाय करणारे व सिव्हिल इंजिनिअर पदवी प्राप्त करून देखील काळ्या मातीशी निष्ठा राखत आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपली शेत जमिन सुपीक करुन सेंद्रिय खताचा वापर करत वीस गुंठे जमिनीत ( कमी खर्चात जास्त उत्पन्न..) मेथी भाजीचे घेतले एक लाख रुपयाचे उत्पन्न. उत्तम
दर्जाची मेथी आणण्यासाठी त्यांनी प्रथमतः शेतीला पोषक अशा शेणखताचा वापर केला. तसेच मेथीला पाण्याचे नियोजन तुषार सिंचनाच्या द्वारे केले. चांगल्या दर्जाची औषध फवारणी करुन त्यांनी या मेथी भाजीचे उत्पन्न घेतले आहे. आजच्या काळात शेतीकडे बघण्याचा समाजाचा, व तरुणांचा दृष्टिकोन बदललेला आहे, भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. आजच्या युगात तरुणांनी आधुनिक पद्धतीचा अभ्यास करून योग्य प्रकारे जर शेती केली तर शेती ही कधीच तोट्यात नाही शेतीतून माणूस शाश्वत उत्पन्न कमवू शकतो. हे सिव्हिल इंजिनिअर कु. किरण शेंडकर यांनी दाखवून दिले आहे. पुणे जिल्ह्यात नर्सरी उद्योगाला चांगल्या प्रतिसाद मिळत असून. उत्पन्नासाठी पोषक वातावरण देखील आहे. असे मत प्रगतशील बागायतदार रघुनाथ शेंडकर यांनी व्यक्त केले.
अबब..! तब्बल ४११ रु.किलो डाळिंब,इंदापूर तालुक्यातील ध्येयवेड्या शेतकरी बंधूंनी पिकवल सोनं..करा खालील लिंक ओपन.👇👇