बिरोबा वाडी येथे पेयजल पाण्याच्या टाकीचे निकृष्ट दर्जाचे काम ग्रामस्थांची चौकशीची मागणी.

बिरोबा वाडी येथे पेयजल पाण्याच्या टाकीचे निकृष्ट दर्पेयजल योजना सन 2018/19 अंतर्गत पाण्याची टाकी आणी पाणी वितरण वाहीनी चे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असल्याने चौकशी करण्या बाबत उपरोक्त विषयास अनुसरून मौजे बिरोबावाडी येथिल पाण्याच्या टाकीचे व वितरण वाहीनीचे काम पेयजल योजना सन 2018-19 अंतर्गत मंजूर झाले होते. सदर काम सन 2020 मध्ये पूर्ण करण्यात आलेले आहे ,सदर करण्यात आलेले काम निकृष्ट दर्जाचे असून पाण्याची टाकी ठिकठिकाणी गळत आहे तसेच पाणी वितरण वाहिनीचे काम कोटेशन प्रमाणे झालेले नाही,काही ठिकाणी वितरण वाहिनी साठी वापरण्यात आलेल पाईपची साईज कोटेशन प्रमाणे नसून बारीक पाईप वापरण्यात आलेले आहेत तसेच वितरण वाहिनी चे पाईप जुन्या पाटस ग्रामपंचायतीच्या वितरण वाहिनीला जोडण्यात आलेले आहेत तरी कृपया आपन चौकशी करून दोषी अधिकारी व कंत्राटदार यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा बिरोबावाड़ी सदस्या कडुन पंचायत समिती वर बोंबाबोंद अंदोलन करण्यात येईल तसेच वेळ पडल्यावर अमरण अपोषण मोर्चा करण्यात येईल, असा इशारा बिरोबावाडी येथील ग्रामस्थ यांनी दिला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here