बावडा येथील शिवाजी विद्यालय येथे भाजप युवा मोर्चा कोअर कमिटी अध्यक्ष राजवर्धनदादा पाटील व भारतीय जनता पार्टीच्या यांच्या वतीने दहावीच्या परीक्षेत पहिले तीन क्रमांक आलेले विद्यार्थी व वेगवेगळ्या विषय मध्ये चांगले मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . विद्यालयातील जास्त टक्के पडलेल्या पैकी विराज टिळेकर 94%, प्रणोती घोगरे 93.94% व कमलेश सातपुते 93.20% या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रतिमापूजन करण्यात आले .त्यानंतर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठा सेवा संघ प्रदेश उपाध्यक्ष पवनराजे घोगरे, भाजपचे सरचिटणीस सचिन सावंत, भाजप युवा मोर्चा इंदापूर तालुका उपाध्यक्ष चिंतामणी गायकवाड. शत्रुघन मुंडे सर, सांगळे सर ,भाजप अल्पसंख्यांक सेल सरचिटणीस शाहरुख जामदार ,जय मल्हार क्रांती युवक अध्यक्ष रोहित चव्हाण ,भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक सेल उपाध्यक्ष मुजमीन तांबोळी ,आकाश बोबडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले .यावेळी बावडा ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब कांबळे, प्रतिक घोगरे, मुंडे मॅडम,टोगंळे मॅडम,वाघमोडे सर,सुरज आवारे, दर्शन गायकवाड, नेहल गायकवाड,इ मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष चिंतामणी शरद गायकवाड यांनी केले व कार्यक्रमाचे आभार भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक सेल सरचिटणीस शाहरुख जमादार यांनी व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी सेजल माने यांनी केले.