इंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा दूरक्षेत्र हद्दीमध्ये बावडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील हे लाखेवाडी ता.इंदापूर परिसरात रात्रगस्त करीत असताना गोपनीय माहिती मिळालेल्या माहितीच्या आधारे अवैध दारू अड्डयावर छापा मारून दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे रसायनासह साहित्य जप्त करण्यात आले.लाखेवाडी गावामध्ये नुकतेच निवडून आलेल्या महिला सरपंच चित्रलेखा ढोले यांनी तातडीचे ग्रामसभा बोलावून अवैद्य दारू, जुगार, मटका धंदाविरोधी कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव केल्याने व त्यास गावातील महिलांनी व ग्रामस्थांनी संमती दिल्याने पुढील काळामध्ये हा व्यवसाय होणार नाही व त्यासाठी ग्रामस्थांबरोबरच पोलीस प्रशासनाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे ठणकावून सांगितल्याने त्यास गावाने व पोलीस प्रशासनाने संमती दिल्याचे दिसून आले.याबाबत सविस्तर वृत्त असे की,सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व पोलीस कर्मचारी लाखेवाडी तालुका इंदापूर परिसरात रात्रगस्त करीत असताना गोपनीय माहिती मिळालेल्या माहितीच्या आधारे बेकायदेशीर हातभट्टी (दारू) विक्री होत असल्याचे माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी ताबडतोब पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून नियोजनबद्ध लाखेवाडी येथील दोन इसमांनी उसाच्या शेतात हातभट्टी दारू तयार करण्यासाठी रसायन तयार केलेल्या ठिकाणी छापा मारून रसायानासह भरलेले बॅरल जप्त करण्यात आले. सदर छाप्यांमध्ये एकूण दोन लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन इसमावरती भारतीय दंड विधान संहिता कलम ३२८ व महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
याच गावात अवैधरित्या मटका व्यवसायावर छापा मारून मटका चालविणारे दोन इसमाकडुन ३१००/ रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला व महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.या दोन्ही कारवाईत मिळून एकूण २,१५,१०० / रूपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, महिला पोलीस हवालदार खंडागळे, पोलीस नाईक हेगडे, पोलीस शिपाई दिनेश कांबळे व शिंदे यांनी मिळून केली.
Home Uncategorized बावडा पोलिसांची मोठी कारवाई, लाखेवाडीत हातभट्टीवर छापा,गावठी दारुसह २ लाख १५ हजारांचा...