बावडा गावासाठी वाढीव नळपाणीपुरवठा अंतर्गत 6 कोटी 23 लाख खर्चास प्रशासकीय मंजूरी- अंकिता पाटील ठाकरे

इंदापूर : प्रतिनिधी दि. 26/8/2022
बावडा गावची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन विस्तारित नळ पाणीपुरवठा योजनेस केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने दोन दिवसांपूर्वी बुधवार,दि.24 ऑगस्ट 22 रोजी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी 6 कोटी 22 लाख 74 हजार रुपये खर्च येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व इस्मा नवी दिल्लीच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी शुक्रवारी (दि.26) दिली. भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नांमुळे सदरची विस्तारित नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेस शिवसेना-भाजप सरकारने तात्काळ मंजुरी दिलेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले. या वाढीव स्वतंत्र योजनेमुळे बावडा गावच्या परिसरातील बारावा फाटा, अरगडे वस्ती, घोगरेवस्ती, रत्नप्रभादेवीनगर आदी परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार आहे, एक वर्षात योजना पूर्ण होईल, अशी माहिती अंकिता पाटील ठाकरे यांनी दिली. यावेळी सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here