बाळासाहेब ठाकरे यांची आज 96 वी जयंती,उद्धव ठाकरे आज शिवसैनिकांशी साधणार ऑनलाईन संवाद

इंदापूर (23 जानेवारी): शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 96 वी जयंती आहे. या निमित्तानं दादर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळावर फुलांनी सजावट करण्यात आली आहे. आजच्या दिवशी स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी अनेक शिवसैनिक, कार्यकर्ते, मान्यवर दाखल होतायेत आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत.
दरवर्षी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. पण गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचं सावट असल्यामुळे बाळासाहेबांची जयंती साधेपणानं साजरी करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज्यभरात शिवसैनिकांकडून विविध कार्यक्रम राबवले जातात. यामध्ये रक्तदान शिबिरे आणि इतर सार्वजनिक उपक्रमांचा प्रामुख्याने समावेश असतो.
शिवसैनिकांना काय आदेश देणार?
येत्या काळात होणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका लक्षात घेता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना काय आदेश देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्धव ठाकरे रात्री 8 वाजता शिवसैनिकांसोबत संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करतील.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here