हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नावात आजही शक्ती तशीच – आमदार दत्तात्रय भरणे.

👉 शिवसंग्राम व्याख्यानमालेमुळे मिळाली विचाराची शिदोरी..
वालचंदनगर(प्रतिनिधी):हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावातच इतकी मोठी शक्ती आहे की, हे नाव उच्चारताच प्रेरणा मिळते.सामान्य माणसाच्या,समाजाच्या भल्यासाठी अहोरात्र काम करून,कायमचा आदर्श देशापुढे नाही तर, जगापुढे ठेवण्याची किमया बाळासाहेब ठाकरे यांनी केली असे गौरवोद्गार राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी काढले.स्वाभिमानी युवा संमेलन हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्ताने,आयोजित जीवन ज्योत अपंग संस्था,व ॲड.नितीन कदम मित्र मंडळ शिरसटवाडी यांच्यावतीने शिवसंग्राम व्याख्यानमाला प्रसिद्ध व्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे युवा काल,आज आणि उद्या व्याख्यान पार पडले.यावेळी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे अध्यक्षस्थानी बोलत होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून,मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते, इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग, ॲड नितीन कदम, जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य सचिन सपकळ,गावचे सरपंच नाना रावन,बापूराव बल्लाळ,अक्षय कदम,सचिन कदम,आनंता दांगट,स्वप्नील कदम,अमर बोराटे,कांतीलाल रणमोडे,संतोष सांळुखे,ह.भ.प.बाळासाहेब पवार,संग्रामसिंह कदम,मंगेश माने,पांडुरंग पानसरे,अतुल जाधव,फिरोजपठाण,ग्रामविकास अधिकारी आबासाहेब जगताप,चेअरमन किशोर पवार,गणेश शेळके,महेंद्र रेडके,शंकरराव कदम,सुदर्शन रणवरे,युवराज मोरे,विष्णु पवार व कार्यक्रमाचे आयोजक ॲड. नितीन कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना आमदार भरणे म्हणाले की,प्रत्येक गावामध्ये चांगलं काम करणारी माणसं असतात.मात्र ती जनतेने वेळीच ओळखली पाहिजेत.काम करणाऱ्या माणसाला नुसती पाठीवर थाप दिली तरी,पुढे सामाजिक कामाचा वेग वाढतो.विधीतज्ञ नितीन कदम यांनी अनेक वर्षापासून व्याख्यानमालेची परंपरा शिरसटवाडी सारख्या छोट्या गावात यशस्वीपणे राबवलेली आहे.समाज उपयोगी कामासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून,खंबीर पाठीशी कायम उभा राहील अशीही ग्वाही आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.यावेळी आयोजक ॲड नितीन कदम म्हणाले की,हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद असल्यामुळे,समाज उपयोगी,लोकोपयोगी कामे करताना अधिकची ताकद मिळते.१७ वर्ष शिरसटवाडी गावकऱ्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त विचारांची मेजवानी मिळावी,म्हणून असे उपक्रम संस्था राबवते याला गावकऱ्यांची साथ मिळते. आगामी काळात असेच उपक्रम अखंड सुरू राहतील.अशी माहिती नितीन कदम यांनी दिली.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here