बाळासाहेब ठाकरे प्रेरणादायी व्यक्तिमत्व- हर्षवर्धन पाटील
इंदापूर : प्रतिनिधी दि.23/1/23
जगभरातील मराठी मनाचे हक्काचे आश्रयस्थान बाळासाहेब ठाकरे होते. जे देश हिताचे असेल ते मी करणार हा विचार त्यांनी समाजकारण, राजकारण करताना कायम ठेवला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्व हे प्रेरणादायी होते, या शब्दात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.
बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्व रोखठोक स्वभावाचे होते. एकही राजकीय पद न भूषवता देशातील राजकारण करणारे ते महान नेते होते, असे गौरोदगारही हर्षवर्धन पाटील यांनी काढले. आज राज्य विधिमंडळात होणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरण समारंभासही हर्षवर्धन पाटील यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.