इंदापूर प्रतिनिधी: कोरोनानंतर कौटुंबिक हिंसाचार, बालविवाह यामध्ये मोठी वाढ झाली असून शेकडो बालविवाह रोखले जात आहेत परंतु माहीत न झालेल्या बालविवाहचेही प्रमाण मोठे आहे.याचा परिणाम मातामृत्यू व बालमृत्यू यामध्ये वाढ झाली आहे.बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार गुन्हा दाखल होतो. पण या कायद्यांमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. २००६ च्या कायद्यानुसार विवाह करून देणारे कुटुंब, फोटोग्राफर, मंगल कार्यालय व भडजी एवढ्यावरच गुन्हा दाखल होतो. खरं तर राज्य आयोग याच्यावतीने राज्य शासनास शिफारस करण्यास सांगितले आहे. ज्या ग्रामपंचायत मध्ये बालविवाह होईल त्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सरपंच यांच्यावरही दोषारोप सिद्ध करा आणि तो सिद्ध झाल्यास तीन महिन्यासाठी त्यांच्या पदास स्थगिती द्या असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या आयोजित शरद कृषी महोत्सव २०२२ च्या निमित्ताने महिला मेळाव्यात रूपाली चाकणकर मार्गदर्शन करत होत्या त्यावेळी त्यांनी प्रतिपादन केले.
यावेळी शरयू फाउंडेशनच्या अध्यक्ष शर्मिलाताई पवार, अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई पवार ,माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, वैशाली नागवडे, भारती शेवाळे, सारिका भरणे, छायाताई पडसळकर, रेहना मुलाणी, स्मिता पवार, सुनीता भोसले, रूपाली नगरे, नीता तेलगे,अश्विनी सरवदे, उज्वला परदेशी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी चाकणकर म्हणाल्या, उद्याचा सक्षम सदृढ महाराष्ट्राचे स्वप्न पाहायचे तर पुढील काळात बालविवाह, अंधश्रद्धा, कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी प्रयत्न करणे. साहेबांचा वाढदिवस म्हणजे सर्वांसाठी एक सण असतो.महिलामधिल कर्तुत्वाला संधी दिली जाते हे राष्ट्रवादी काँग्रेसने दाखवून दिले आहे. प्रत्येक ठिकाणी महिलांना संधी देण्यासाठी साहेबांचा कटाक्ष असतो.
शरद पवार साहेब कायम सांगतात कोणत्याही राज्याचे, देशाचे, राष्ट्राचे राजकारण यशस्वी करायचे असेल तर महिलांचा सहभाग असणे आवश्यक आहे कारण महिला निर्णय घेतात सुरुवात करतात, सातत्य ठेवतात व घेतलेला निर्णय शेवटपर्यंत घेऊन जातात त्यांच्यात सृजनशीलता असते.कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणात नको असलेल्या जाहिराती पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर येतात याबाबत केंद्राला पत्र लिहा आहे मात्र ही मोठी साखळी असल्याने यात मोठी आर्थिक उलाढाल असल्याने यामधून युवा पिढीला कमकुवत करण्याचे काम सुरू आहे हे थांबणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी शरयू फाउंडेशनच्या अध्यक्ष शर्मिलाताई पवार, अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक छाया पडसळकर, सूत्रसंचालन प्रतीक्षा बालगुडे तर आभार प्रदर्शन रेहणा मुलाणी यांनी केले.
Home Uncategorized बालविवाह होईल त्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सरपंच यांच्यावरही दोषारोप सिद्ध करा –...