बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास हा फक्त बारामती शहरापुरताच मर्यादित- विजय(बापू ) शिवतारे

बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या प्रवक्ते पदी माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांनी कारभार हाती घेतल्यानंतर प्राधान्याने शिवसेनावाढीच्या दृष्टीने त्यांनी इन्कमिंग चालू केले. शिवसेना घराघरात पोहोचवण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुद्धा जोमात चालू आहे. दिनांक 25 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील व त्यांचे सहकारी यांचा शिवसेनेत (बाळासाहेबांची) प्रवेश घेतल्यानंतर इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादीला एक मोठा धक्का देण्यात शिवतारे बापू यशस्वी झाले होते.
बारामती लोकसभा मतसरसंघाचा विकास हा फक्त बारामती शहरापुरताच मर्यादित असून लोकसभा मतदारसंघाचा विकास नाही.आजही बारामतीच्या विविध भागात पिण्याच्या पाण्यासाठी जनता वणवण करत आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्ष हा प्रश्न प्रलंबितच आहे. यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती सुद्धा जादू करेल. असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.
इंदापूर शहरामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी शिवतारे बोलत होते.यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र देवरे, नवनियुक्त तालुकाप्रमुख महारुद्र पाटील,
अशोक देवकर, वसंत आरडे, अवधूत पाटील,देविदास भोंग, प्रहार संघटनेचे अध्यक्ष दादाराम शिंदे, अक्रम शेख, मुबारक सय्यद, वैभव जामदार, दुर्वास शेवाळे यांचेसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवतारे म्हणाले, देशातील मोठमोठे पुढारी बोलवून फक्त बारामती शहरच दाखवायचे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला असे भासवायचे यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाचे नाव बदलून त्याऐवजी पुणे दक्षिण करण्याची मागणी करणार आहे.शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून सत्तेच्या विकेंद्रीकरणावर भर असून विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे.औद्योगिक कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असलेल्या इएसआयसी चे हॉस्पिटल बारामतीच का ? असा प्रश्न उपस्थित करीत सदर हॉस्पिटल हे पुरंदर किंवा भोर मध्ये होणे आवश्यक असून याबाबत पत्रव्यवहार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
♟️इंदापूर तालुक्याची धुरा महारुद्र पाटील यांचेकडे: 
यावेळी विजय शिवतारे यांनी बाळासाहेबांची शिवसेनेच्या इंदापूर तालुका प्रमुखपदी महारुद्र पाटील यांच्या नियुक्तीची घोषणा करीत यापुढे तालुक्यातील पक्षाचे सर्व निर्णय हे महारुद्र पाटीलच घेतील असे जाहीर केले.
🔑 इंदापूरचा भावी आमदार निवडण्याची चावी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या हाती: 
यावेळी बोलताना विजय शिवतारे यांनी इंदापूरच्या राजकीय परिस्थितीबाबत म्हणाले भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांचे शिवसेना हे सहयोगी पक्ष आहेत यांची मूठ घट्ट असून कोणताही निर्णय हा विचारानेच घेतला जाईल त्याचवेळी येणाऱ्या निवडणुकीमध्ये इंदापूरचा आमदार निवडण्याची चावी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या हाती असेल असा दावा त्यांनी यावेळी केला.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here