अवघ्या 3 वर्षाच्या मुलीचे चारचाकीत टाकून जबरी अपहरण…कर्तव्यदक्ष खाकीने 4 तासात केली सुटका. कर्तबगार पोलिसांचे सर्वत्र कौतुक.

माढा (प्रतिनिधी:नसीर बागवान) गेल्या काही महिन्यांपासून मुले पळवणाऱ्या टीमच्या चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत होत्या. कालांतराने या सर्व चर्चा ह्या अफवा आहेत असेही सोशल मीडिया मार्फत सांगण्यात येत होते.,परंतु माढा तालुक्यातील खालील घडलेल्या अपहरणाच्या घटनेमुळे मात्र पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मानेगाव (ता. माढा) येथे राहणाऱ्या मीनल अहिरे यांच्या अवघ्या तीन‌ वर्षाच्या मुलीचे मानेगाव येथील हॉटेल आरोही येथून गुरूवारी सकाळी साडेदहा वाजता अपहरण करण्यात आले.अहिरे या मूळच्या साक्री (जि. धुळे) येथील रहिवासी असून सध्या माढा येथे राहत आहेत. चिमुकलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार श्रीकांत शेवाळे याने मुलीला जबरदस्तीने उचलून कारमधे टाकून पळवून नेल्याचा प्रकार घडला होता. याबाबत मुलीची आई मीनल यांनी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद देखील दिली. या घटनेनंतर कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक शाम बुवा यांनी
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ शोधा शोध चालू केली.माढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम बुवा यांनी घटनेचे गांभीर्य ध्यानी घेऊन पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी जालींदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे, सहाय्यक पोलीस फौजदार राजेंद्र भापकर, संदीप निचळ, मेघा आगवणे यांचे एक पथक तयार केले.
या पथकाने सदर आरोपीबाबत अधिक माहिती घेऊन तांत्रिक तपासाच्या आधारे सदर पथकाने आरोपीचा शोध घेऊन मुलीची त्वरित सुटका करण्याचे आदेश दिले. सदर पथकातील पोलीस नाईक रतन जाधव यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत तांत्रिक माहिती तत्परतेने दिली.
तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीला बीड जिल्ह्यातून ताब्यात घेतले.आरोपी हा युसुफ वडगांव पोलीस ठाणे (ता.केज जि. बीड) यांच्या हददीतून जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार युसुफ वडगांव पोलिसांशी संपर्क साधत श्रीकांत शेवाळे यास गुन्हयात वापरलेल्या कारसह ताब्यात घेण्यात आले. अपहरित चिमुकलीला माढ्यात आणून सुखरूपपणे तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले. संशयित आरोपी श्रीकांत शेवाळे यास अटक करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार राजेंद्र भापकर करीत आहेत. सदरची झालेली घटना वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली असून पालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर अवघ्या चार तासात इतक्या मोठ्या प्रकरणाचा छडा लावल्याने कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक शाम बुवासह त्यांच्या सर्व टीमचे कौतुकही माढा तालुक्यात केले जात आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here