इंदापूर बेडशिंगे ,अवसरी, भाटनिमगाव, भांडगाव, गलांडवाडी या रस्त्याच्या दुरावस्थेबाबतची बातमी जनता एक्सप्रेस मराठी न्यूजने मागील चार दिवसांपूर्वी लावली होती आणि याच बातमीची दखल घेऊन मा. मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब व इंदापूरचे कर्तव्यदक्ष अधिकारी तहसीलदार श्रीकांत पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून आज रस्ता सुरू झालेला आहे. बरेच दिवस झाले बंद पडलेला हा रस्ता अखेर आज चालू झाल्यामुळे अवसरी, बेडशिंगे, गलांडवाडी भाटनिमगाव ,भांडगाव या गावातील ग्रामस्थ माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व तहसीलदार श्रीकांत पाटील यांचे विशेष कौतुक करत आहेत. जवळपास दीड ते दोन महिने हा रस्ता बंद होता त्यामुळे अत्यावश्यक सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती .ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर एसटी महामंडळाची लालपरी बंद होती त्यामुळे नागरिकांना याचा खूप त्रास होत होता. अवसरी, बेडशिंगे ,भाटनिमगाव या गावातील नागरिकांनी रस्ता चालू करण्यासाठी बांधकाम विभाग व तहसीलदारांना निवेदन ही दिले होते तरीसुद्धा बरेच दिवस हा रस्ता बंद होता. मा. मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी याचा पाठपुरावा केला तहसीलदार साहेब यांना व बांधकाम विभाग यांनाही त्यांनी फोन द्वारे संपर्क करून तातडीने तो रस्त्याचा विषय मिटवावा असे सांगितले होते आणि जनता एक्सप्रेस मराठी न्यूजने सुद्धा त्या संदर्भात लोकांची गैरसोय कशी होते व अत्यावश्यक सेवा ठप्प झाल्याची बातमी लावली होती. शेवटी बरेच दिवस झाले बंद पडलेला हा रस्ता हर्षवर्धन पाटील व तहसीलदार श्रीकांत पाटील व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या प्रयत्नातून हा मार्ग मोकळा होऊन तो रस्ता आज चालू झाला .त्यामुळे तहसीलदार श्रीकांत पाटील साहेबांबरोबरच हर्षवर्धन पाटील यांचेही विशेष लक्ष अवसरी ,बेडशिंगे, भाटनिमगाव ,भांडगाव गलांडवाडी गावाकडे आहे अशीच चर्चा सर्वसामान्य लोकांमध्ये आज चालू असल्याचे दिसून आले.याच रस्त्याची दखल घेण्याकरता लावलेली बातमी पुढील लिंकवर https://janataexpressmarathinews.com/इंदापूर-बेडशिंगे-अवसरी-भ/