बहुजन विकास आघाडीची 35 वर्षाची परंपरा संपुष्टात.

वैभव पाटील :पालघर जिल्हा प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यात नुकताच पार पडलेल्या दुसऱ्या टप्प्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल मंगळवारी हाती आले असून सरपंच जनतेतून निवडला आहे. सफाळे पश्चिमेला असलेल्या माकणे ग्रामपंचायती हि मोठी असुन ३५ वर्ष बहुजन विकास आघाडीची सत्ता होती. या निवडणुकीत श्रीदत्त परिवर्तन पॅनलची 35 वर्षांनंतर एकहाती सत्ता आली असून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून आले असून उपसरपंच दिलीप तरे यांचा पराजय झाला आहे
माकणे ग्रामपंचायतीवर बहुजन विकास आघाडीची 35 वर्षाची सत्ता होती. या सत्ता संपुष्टात आणण्यासाठी गावातील सर्व पक्ष एकत्र येऊन युती प्रस्थापित केली होती. श्रीदत्त परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून दहा पैकी सरपंच‌ प्रमोद गंगाराम शेलार व 6 सदस्य असे एकूण सात सदस्य बहुमताने निवडून आले आहेत. विराथन खुर्द येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सत्ता स्थापन केली आहे. विळंगी येथे मनसेचा झेंडा फडकला असून सरपंच सुमीता गिरीष घरत व चार सदस्य निवडून आले आहेत. उसरणी येथील गाव परिवर्तन संघ रिया रमेश वैद्य सरपंचपदी निवडून आल्या तर आगरवाडीत युवा शक्ती पॅनल निवडून आले आहे . कर्दळ व खार्डी ग्रामपंचायतीमध्ये मागील केलेल्या विकास कामांची पोचपावती मतदारांनी दिल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिटी वाजली असून दोन्ही ठिकाणी एक हाती सत्ता आली आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here