इंदापूर:(संतोष तावरे यांच्याकडून): माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात रस्त्यांचा कायापालट झालेला असून रस्त्यांचे जाळे जुळवत वाड्या-वस्त्यांना व गावागावांना जोडण्याचे काम माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.इंदापूर तालुक्यात रस्त्यांचा विकास झाला असला तरी अवसरी-वडापुरी हा महत्त्वपूर्ण रस्ता काही वर्ष दुर्लक्षितच होता आणि त्या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे अवसरी,भाटनिमगाव,भांडगाव, वडापुरी इत्यादी गावातील शेतकरी,शाळकरी मुले,शेतमजूर या सर्वांना नाहक त्रास होत होता. गेल्या महिन्यात संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांचा गाव भेट दौरा होता आणि या दौऱ्या दरम्यान अवसरी-वडापुरी रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल जनता एक्सप्रेस मराठी न्यूजच्या माध्यमातून बातम्या प्रसारित झालेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाचल्या होत्या. त्यांनी स्वतः त्या रस्त्यावरून प्रवास केला व त्वरित आमदार दत्तात्रय मामा भरणे यांना फोन करून हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावेळी दत्तात्रय भरणे यांनी हा रस्ता आपण लवकरच हाती घेणार आहोत आणि त्याची प्रक्रिया लवकरच चालू होईल अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांना दिली होती.आमदार भरणे मामा यांनी दिलेल्या आश्वासना नुसार या कामाला आता वेग मिळाला असून आमदार भरणे मामा यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना 2022-23 अंतर्गत या रस्त्यास 70 लाख रु.मंजूर झाले आहेत अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांच्या कार्यालयातून मिळाली आहे. अनेक दिवसापासून रखडलेला हा रस्ता आता पूर्ण होणार आहे व यापुढे या रस्त्याला झेंडू बाम रस्ता अशी म्हणण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा पंचक्रोशीतील लोकांना वाटत आहे.खरंतर झेंडू बाम रस्ता या नावाने खूप कुप्रसिद्ध असलेला हा रस्ता आता आमदार भरणे मामांच्या माध्यमातून पूर्ण होणार असल्याने अवसरी, वडापुरी, भाटनिमगाव, भांडगाव,गलांडवाडी या गावातील ग्रामस्थांनी,विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी आमदार भरणेमामांसह खासदार सुप्रिया सुळे यांचेही आभार मानले आहेत.व हा रस्ता पूर्ण झाल्यावर या रस्त्याचे उद्घाटनही खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व आमदार दत्तामामा भरणे यांच्या उपस्थितीत व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे…
Home Uncategorized बहुचर्चित अवसरी-वडापुरी रस्त्यासाठी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर,पंचक्रोशीतील नागरिकांनी मानले आमदार भरणेमामांसह...