व्याहाळी केंद्राची शिक्षण परिषद पोंदकुलवाडी शाळेत मोठ्या उत्साहात संपन्न.
निमगाव केतकी (प्रतिनिधी: सचिन शिंदे)– आज दिनांक २ डिसेंबर २०२१ रोजी व्याहाळी केंद्राची शिक्षण परिषद पोंदकुलवाडी शाळेत मोठ्या उत्साहात पार पडली.प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन कर्मयोगी कारखान्याचे संचालक छगन भोंगळे, शाळा व्य समितीचे अध्यक्ष बापू बोराटे,केंद्रप्रमुख संभाजी आजबे,केंद्रप्रमुख भिवा हगारे यांच्या हस्ते पार पडले.नंतर केंद्रप्रमुख संभाजी आजबे यांनी प्रास्ताविक केले.छगन भोंगळे यांनी शाळेतील महिला शिक्षिकांचे कौतूक करून परिषदेस शुभेच्छा दिल्या.नंतर सुलभक सुजाता भोंग/कुदळे यांनी प्रथम पुर्वचाचणी सोडवून घेतली नंतर मुख्याध्यापक जबाबदारी व कर्तव्ये याविषयी सखोल मार्गदर्शन केले.नंतर दुसऱ्या सत्रामध्ये सुलभक राजकुमार भोंग यांनी कृती संशोधन व नवोपक्रम याविषयी माहिती दिली.त्यानंतर उत्तर चाचणी सोडवून घेतली.पोंदकुलवाडी शाळेच्या वतीने चहा,नाश्त्याची सोय करण्यात आली.सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षिका अश्विनी आदलिंग यांनी केले तर आभार उज्ज्वलकुमार सुतार यांनी मानले.सदर शिक्षण परिषद कोरोनाचे नियम पाळून पार पडली.