प्राथमिक आरोग्य केंद्र दे.राजे आयोजित मोफत महाआरोग्य शिबिर व जागरुक पालक सुदृढ बालक अभियान.

प्रतिनिधी : महेश सूर्यवंशी
देऊळगाव राजे,दौंड. दि.०९ /०२/२०२३ रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत, जिल्हा परिषद, पुणे, पंचायत समिती, दौंड व प्राथमिक आरोग्य केंद्र,देऊळगांव राजे यांच्या संयुक्त विद्यमाने .जागरुक पालक सुदृढ बालक अभियान रबविण्यात येत आहे. या शिबिरामध्ये मोफत सर्व रोग चिकित्सा व निदान करण्यात येणार आहे.या शिबिरासाठी प्रमुख उपस्थित पदाधिकारी श्री. राहुल कुल (आमदार, दौंड) मा. श्री. वीरधवल जगदाळे मा. सदस्य, जिल्हा परिषद, पुणे मा. सौ. ताराबाई देवकाते मा.सदस्य, पंचायत समिती, दौंड मा. श्री. आयुष प्रसाद (IAS) मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. पुणे मा. श्री. अजिंक्य येळे गट विकास अधिकारी (वर्ग १) पंचायत समिती, दौंड मा. श्री. वासुदेव शंकरराव काळे (सदस्य, जिल्हा नियोजन समिती) मा. सौ. स्वाती अमित गिरमकर (सरपंच, देऊळगांव राजे) मा. सौ. शुभांगी दादासो गिरमकर (उपसरपंच, देऊळगांव राजे) आदी उपस्थित राहणार आहेत. सर्वरोग निदान शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक मा. डॉ. भगवान पवार (जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. पुणे) मा.डॉ. उज्ज्वला जाधव तालुका वैद्यकीय अधिकारी, पं. स. दौंड सदर शिबिरामध्ये खालील सर्व तज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करून उपचार करणार आहेत तसेच पुढील उपचारासाठी रुग्णांना जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय संदर्भित करण्यात येणार आहे. शिबिरासाठी खालील तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. डॉ. संजीव कारंडे (स्त्रिरोग तज्ञ) डॉ. अविनाश अल्लमवार (वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र दे. राजे) डॉ. रचना गुजर (वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र दे. राजे) डॉ. सौ. अर्चना वाघमोरे (बालरोग तज्ञ) डॉ. मयूर वाहुळे C.H.O डॉ. सुप्रिया तलवारे C.H.O डॉ. कोमल गावडे C.H.O डॉ. तनुजा कुन्हाडे C.H.O डॉ. अजयकुमार पोतन C.H.O सर्व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, देऊळगांव राजे. ता. दौंड, जि. पुणे. सर्व सुजाण नागरिकांनी, रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव राजे चे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश अल्लमवार यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here