प्रतिनिधी : महेश सूर्यवंशी–वरवंड ता.दौंड येथे (दि.25 व 26 जून) रोजी देऊळगाव राजे जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र याच्या मार्फत संत तुकाराम महाराज पालखीतील वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यात आली. दि 25 जून रोजी देऊळगाव राजे चे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश अल्लमवार वेळेवर कर्तव्यावर असताना एका 46 वर्षीय महिलेला (रा.जालना) उच्च रक्तदाब होऊन हुदयविकाराच्या झटक्याचे संकेत दिसून आले असता , त्यांना तातडीने प्रथमोपचार भेटल्याने आघात टळला.दुसऱ्या दिवशी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सेवा देताना एकूण 1550 ते 1600 वारकरी पेशंट ची तपासणी करून त्यांच्या वर उपचार करण्यात आले. अंगदुखी,सरदी, खोकला,ताप,अशा आजारांवर निदान करण्यात आले तसेच पायी चालून तळपायांना व वरील बाजूस फोड जखमा झालेल्या वारकऱ्यांना मलम पट्टी करून उपचार करण्यात आले .तसेच कोरोना संशयित तीनशे रुग्णांची अंटिजेन तपासणी करण्यात आल्याच डॉ.अविनाश अल्लमवार यांनी सांगितलं त्यांच्या बरोबर प्रयोगशाळा तंत्रज्ञ सौ.दिपाली पलंगे आणि रुग्णवाहिका चालक नितीन वघामोरे व त्यांची टीम होती.या सेवेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे पालखी व्यवस्थापन समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.