प्रहारचे नेते बच्चू कडू हे आपल्या अलग शैलीतून व आंदोलनातून महाराष्ट्रीयन लोकांची मने जिंकण्यात यशस्वी झाले असले तरी अशाच एका आंदोलनामुळे त्यांना जेलमध्ये बसण्याची वेळ आली आहे.
आमदार बच्चू कडू यांचा जामीन अर्ज गिरगाव न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्यायालयाने बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राजकीय आंदोलनाप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे होता. न्यायालयाने कडू यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावला होता.
बच्चू कडू आज न्यायालायासमोर हजर झाले असता त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. हा अर्ज न्यायालायने फेटाळून लावला आहे. जामीन अर्ज फेटळताच बच्चू कडू यांना न्यालयीन कोठडी सुनावल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे. समाजातील दिन दलित आणि गरजूू लोकांना सहकार्य व मदत करण्यात बच्चूू कडू यांचीी ओळख आहे महाराष्ट्रातील तमाम अपंग बंधूंचे ते आधार स्थान म्हणून ओळखले जातात.
Home Uncategorized प्रहारचे बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात, 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी.वाचा सविस्तर.