प्रगल्भ लोकशाहीसाठी सजग मतदार होणे आवश्यक – श्रीकांत पाटील

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना वरिष्ठ व कनिष्ठ विभागाच्या वतीने राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या वेळी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रगल्भ लोकशाहीसाठी सजग मतदार होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यावेळी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ घेतली.तहसीलदार श्रीकांत पाटील म्हणाले की, ‘ आपले कर्तव्य व सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन आपण मतदार यादीमध्ये आपले तसेच ज्यांची अद्याप नोंदणी झाली नाही अशा वय वर्ष 18 पूर्ण झालेल्या व्यक्तींची मतदानासाठी नोंदणी करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे असे मत व्यक्त करीत विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.प्राचार्य डॉ. जीवन सरवदे म्हणाले की,’ देशातील सध्या 91 कोटी मतदार हे देशाच्या लोकशाहीचे भवितव्य ठरवतात.यामध्ये नवीन मतदारांनी आपला सहभाग नोंदवावा.
उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे,डॉ. मनीषा गायकवाड , क्रीडासंचालक डॉ. भरत भुजबळ,प्रा. दत्तात्रय गोळे , दीपक पवार यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.राजेंद्र साळुंखे यांनी केले.प्राध्यापिका सुवर्णा जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार प्रा.भारत शेंडे यांनी मानले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here