इंदापूर:दिनांक 24/02/2023 रोजी मौजे – विठ्ठलवाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला.तालुका कृषी अधिकारी, इंदापूर श्री.भाऊसाहेब रुपनवर यांच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व पटवून दिले जात आहे.याचाच एक भाग म्हणून आज विठ्ठलवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून पौष्टिक तृणधान्याचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पौष्टिक तृणधान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, राजगिरा, राळा, वरई, नाचणी इत्यादी तृणधान्याचा समावेश होतो.मंडळ कृषी अधिकारी, इंदापूर श्री.कदम साहेब यांनी पौष्टिक तृणधान्याचे मानवी आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. विविध आजारापासून आपल्याला दूर ठेवण्यासाठी पौष्टिक तृणधान्याचा वापर आहारामध्ये वाढवावा असे त्यांनी सांगितले.
पौष्टिक तृणधान्याचा उपयोग आपल्या रोजच्या ऊर्जेच्या गरजा भागवण्यासाठी आवश्यक आहे. आपला आहार कर्बोदके, प्रथिने व जीवनसत्त्वांनी समृद्ध हवा. ही गरज तृणधान्ये भागवतात. त्यामुळे पौष्टिक तृणधान्याचा मानवी आहारामध्ये वापर वाढवावा असे कृषि सहाय्यक श्री.भारत बोंगाणे यांनी सांगितले.
कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती कृषी सहायक श्री. हनुमंत बोडके यांनी दिली.या कार्यक्रमास कृषी सहाय्यक वैभव अभंग, गणेश भोंग, अमोल लवटे, प्रशांत मोरे, प्रताप कदम, महेंद्र बोबडे हे उपस्थित होते.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विठ्ठलवाडी येथील मुख्याध्यापक तांबोळी सर व शिक्षिका नाळे मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.या कार्यक्रमास विठ्ठलवाडी येथील गोविंद बोराटे,तुळशीराम बोराटे, उत्तम बोराटे,भागवत बोराटे, तुकाराम बोराटे, पप्पू शिंदे, अनिल बोराटे, कुंडलिक बोराटे, दीपक ठोंबरे ,जालिंदर डाके यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते