पोलीस मित्र संघटनेने पोलिसांसोबत बजावले आपले समाजसेवेचे कर्तव्य.वाचा सविस्तर.

पालघर प्रतिनिधी: वैभव पाटील
पोलीस मित्र संघटना ही मागील ३५ वर्षांपासून राज्यातील ३६ जिल्ह्यात कार्यरत आहे. सदर संघटनेच्या माध्यमातून पोलिसांवर होणारे अन्याय अत्याचाराविरुद्ध संविधानिक व लोकशाहीच्या माध्यमातून पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस परिवार आणि सर्व सामान्य जनता यांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे पोलिसांवरील वाढता ताण-तणाव कमी करण्यासाठी सण, उत्सव, मोर्चे आणि मिरवणुका इत्यादी ठीकाणी गरज भासल्यास मदत व सहकार्य करण्याचे काम संघटना जिल्हा स्तरावर करत आहे. तसेच याच उपक्रमाचा एक भाग म्हणून दिनांक ३१-०८-२०२२ ते ०९-०९-२०२२ पर्यंत चालणाऱ्या यंदाच्या गणेशोउत्सवात देखील संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाला सहकार्य व मदत करण्याचे विनंती वजा निवेदन सुलक्षण पाटील पालघर जिल्हा अध्यक्ष तथा शांतता समिती सदस्य पालघर पोलीस ठाणे यांनी दिले.यांच्या या निवेदनाला बाळासाहेब पाटील साहेब पोलीस अधीक्षक पालघर जिल्हा यांनी तात्काल मंजुरी देत, पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.पोलीस अधीक्षक यांच्या लेखी मंजुरीनंतर तात्काल पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्रजी कपोते साहेबांच्या मार्गदर्शनानुसार तसेच पालघर जिल्हा अध्यक्ष सुलक्षण पाटील यांच्या संकल्पनेतून आणि पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सहकार्याने व जिल्हा सचिव राजेश संखे यांच्या पुढाकाराने रंजना संखे मॅडम पालघर तालुका महिला अध्यक्ष छगन पाटील साहेब पालघर शहर अध्यक्ष अमोल पवार पालघर तालुका पूर्व विभाग युवा अध्यक्ष यांच्या देखरेखेखाली पालघर, बोईसर, सफाळे, सातपाटी, मनोर, वानगाव, डहाणू , तलासरी इत्यादी विभागातील खेड्यापाड्यातील गावातील तसेच शहरातील सार्वजनिक गणपती विसर्जनाच्या ठिकाणी पोलीस मित्र संघटनेचे तब्बल ११० स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. गर्दीच्या ठिकाण उत्सवाचे भान हरपलेल्या जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांसोबत पोलीस मित्र संघटनेच्या स्वयंसेवकांनी चांगलीच सेवा तसेच मदत केली. या चांगल्या उपक्रमाची त्या त्या ठिकाणच्या स्थानिक पोलीस प्रशासनाने संघटनेचे पर्यायाने स्वयंसेवकांचे कौतुक केले.
याकामी विभागावर संयोजनाची व संयोजक म्हणून सपना प्रभू, सुवर्णा वाघमारे, गजानन किणी, दर्शना पामाळे, विनोद गावड, सचिन मोरे, तुषार घरत, विनायक भोईर, सीताराम गायकवाड, अमेय पिंपळे, विशाल राऊत, तबरेज कुरेशी, मंजूर शेख, जयराम शनवार आदी संयोजकांच्या मदतीने तसेच पोलीस मित्र संघटनेमधील सर्व पोलीस मित्र सदस्य यांच्या उपस्थितीने उकृष्टरित्या कर्तव्य पार पाडून समाजाला अनोखा संदेश देण्याचे काम केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here