पोलीस मित्र संघटना पालघर जिल्ह्याच्या वतीने जनसंवाद अभियान अंतर्गत पोलीस मित्र मेळावा.

पालघर(वैभव पाटील : प्रतिनिधी) दि.29 एप्रिल रोजी इनरव्हील क्लब पालघर पश्चिम येथे पोलीस मित्र संघटना पालघर जिल्हा या संघटनेमार्फत संघटनेचे संस्थापक मा. राजेंद्र कपोते सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष सुलक्षण पाटील यांच्या सहकाराने पोलीस मित्र मेळावा पार पडला. पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक मा.बाळासाहेब पाटील यांच्या जनसंवाद अभियान कार्यक्रमांतर्गत हा मेळावा घेण्यात आला.
आज पोलीस मित्र संघटनेची कार्यशैली आणि जनसामान्यात त्यांच्या कार्याची दखल घेतली जात आहे.गडचिंचले सारख्या साधू हत्या कांडची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता होती. याचे ताजे उदाहरण म्हणजे डहाणू तालुक्यातील वानगाव येथील चंद्रनगर विभागात दोन साधू दोन साधू मुलांना पळवून नेण्यासाठी आले आहेत अशी अफवा परिसरात पसरली लोक लाठ्या-काठ्या घेऊन बाहेर पडले आणि साधू लोकांना मारहाण करणार होते परंतु वाणगाव येथील पोलीस मित्र यांनी तात्काळ वाणगाव पोलीस स्टेशनला फोन करून ह्या गावात साधू आलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल लोकांचा गैरसमज झालेला आहे. लोक त्यांना मारहाण करण्याच्या तयारीत आहेत अशा प्रकारे फोन द्वारे कळवितात तात्काळ वानगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी हजर होऊन साधुणा आपल्या ताब्यात घेतले आणि त्यांची सत्यता पडताळून त्यांना जनसमुदायातून बाजूला घेऊन त्यांची सुटका केली आणि पोलीस स्टेशनला नेऊन त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी रवाना केले अशा प्रकारे जर पोलीस मित्र त्या ठिकाणी नसता तर पुन्हा एकदा गडचिंचले सारखी पुनरावृत्ती नक्कीच झाली असती यात तीळ मात्र शंका नाही अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी आपल्याला प्रत्येक गावात गाव तिथे पोलीस मित्र हे अभियान राबवून प्रत्येक गावात जवळ जवळ दहा पोलीस मित्र तैनात करण्याचे पालघर जिल्हाध्यक्ष श्री सुलक्षण पाटील यांनी संकल्प केलेला आहे.
तसेच सदर कार्यक्रमात नवीन लोकांना संधी देवून पोलीस मित्रांना आयडी वाटप तसेच टी-शर्ट व गाडीवर लावण्यासाठी संघटनेचा लोगो वाटपाचा कार्यक्रम आयोजित करून पोलिसांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी एक पाऊल पुढे येऊन त्यांना सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. सदर कार्यक्रमात संघटनेचे जिल्हासचिव प्राध्यापक व भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश संखे व जिल्हा संघटक शौकत अली शेख तसेच संघटनेच्या कायदेशीर सल्लागार वकील संयुक्त तामोरे मॅडम यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले पालघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांच्या हस्ते व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया पांढरे यांच्या हस्ते टी-शर्ट व आयडीचे वितरण करण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक व वकील तसेच आमदारांचे स्वीय सहाय्यक निलेश राऊत हे प्रमुख अतिथी होते. पालघर शहर कार्याध्यक्ष मिलिंद लोखंडे पालघर शहर प्रभारी सुवर्णा वाघमारे उपाध्यक्ष दर्शना पामाळे आणि यास्मिन लुलानिय व अमरीन लुलानीया यांच्यासोबत रेखा बागुल अमेय पिंपळे तसेच गजानन किणी डॉक्टर राजेश पाटील हेमंत पाटील आणि जवळजवळ शंभर ते दीडशे पोलीस मित्र कार्यक्रमाला हजर होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस मित्र पालघर टीम यांनी मोलाचे योगदान दिले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here