आज दिनांक ०६/०८/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना असोसिएशनचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या सत्कारमूर्तींमध्ये इंदापूर तालुका अध्यक्ष – भारत (नाना) मारकड, कार्याध्यक्ष – अतुल धनवडे उपाध्यक्ष -मनोज होडशिळ, तालुका संघटक – बाळासाहेब कडाळे, इंदापूर तालुका सचिव – प्रदीप हरिदास भोई, महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्ष – वर्षाताई लोंढे, तालुका संघटक – सौ उषाताई वाघमोडे, जिल्हा संघटक – राजेंद्र चव्हाण, बाळासाहेब गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते सुनील राऊत यांचा सन्मान.जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्यावतीने देण्यात येणारा गुणवंत कर्मचारी पुरस्कार हा पोलीस पाटील सुनील राऊत यांना प्राप्त झाल्याबद्दल त्यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.याप्रसंगी बोलताना मा. दत्तात्रय मामा भरणे यांनी पोलीस पाटलांनी गावची कायदा सुव्यवस्था व एकूण परिस्थिती बाबत प्रशासनाला नियमितपणे माहिती द्यावी.माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले की,पोलीस पाटलांच्या काही अडचणी असतील तर त्या निश्चितपणे सोडण्याचा प्रयत्न केला जाईल, कोणत्याही पोलीस पाटलावर अन्याय होत असेल तर मी व्यक्तीशः त्याच्या पाठीशी उभे राहीन असे आश्वासन दिले.या कार्यक्रमास, दिपक बोराटे, तुकाराम खाडे, परमेश्वर ढोले, राजू गायकवाड, विजयकुमार करे, सुनील राऊत, बाळासाहेब कडाळे, अरुण कांबळे, अनिल रामलिंग नगरे, हरिभाऊ खाडे , प्रदीप पोळ पाटील उपस्थित होते.
Home Uncategorized पोलीस पाटील संघटना असोसिएशन च्या नवनियुक्त पदाधिकारी व आदर्श गुणवंत कर्मचारी पुरस्कार...