पोलीस पाटील दिनी होणार पोलीस पाटलांचा नवज्योत ग्रामविकास फाउंडेशन शिरूर चिंचोली मोराची यांच्याकडून सन्मान..

शिरूर ता.प्रतिनिधी सचिन शिंदे
शिरुर : पोलीस दिनाचे अवचित साधून 17 डिसेंबर ला शिरूर तालुक्यातील चिंचोली मोराची गावचे चे पोलीस पाटील मा.अमित उकिर्डे (उपाध्यक्ष शिरूर तालुका पोलीस पाटील संघटना)
यांचा सत्कार नवज्योत ग्रामविकास फाउंडेशन मार्फत होणार आहे.गाव आणी प्रशासन यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील काम करतात.कोराना काळात पोलीस पाटील नी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे.म्हणून पोलीस पाटील दिन या दिवशी त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या वेळी उपस्थित ग्रामविकास सदस्य, चिंचोली मोराची ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार आहे.
गावचा पोलीस पाटील विषयी थोडक्यात
गावातील अपराधांचे प्रमाण व समाज स्वास्थ या बाबत माहिती पुरवणे, पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देणे ,सार्वजनिक शांततेला बाधा  पोहोचणार नाही यासाठी आवश्यक माहिती अधिकाऱ्यांना पुरवणे, गावच्या हद्दीत गुन्हा घडू नये, लोकांचा उपद्रव होऊ नये म्हणून बंदोबस्त करणे व आपल्या हद्दीतील  गुन्हेगारांचा शोध घेऊन न्यायालयासमोर हजर करण्यास मदत करणे इत्यादी कामे पोलीस पाटील करतात. कायदा व सुव्यवस्था राखणे, गावपातळीवर किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रातील गुन्ह्याची माहिती पोलीस ठाण्यास देणे, विनापरवाना शस्त्र बाळगणेस मनाई करणे,नैसर्गिक आपत्ती व रोगराई या गोष्टींचा अहवाल वरिष्ठांना देणे.गावात अनैसर्गिक किंवा  संशयास्पद मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना देणे.
कायद्यात तरतुद असलेल्या या कामांबरोबरच गावातील सण,उत्सव,यात्रा, राजकारण, निवडणुका या सर्वच घडामोडीवर पोलीस पाटील लक्ष ठेउन असतात. ग्रामपंचायत व वेगवेगळ्या निवडणुकांच्या काळात पोलीस पाटील गावपातळीवरील हालचालींबाबत पोलिस प्रशासनाला माहीती उपलब्ध करुन देत असतो. पोलीस पाटील या नेमणुकीवरील व्यक्ती ही त्याच गावची असल्याने सर्वाना ओळखत असते. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक ,बेकायदेशिर व्यवसाय करणारे, अवैध धंदेवाले, याबद्धल पूर्ण माहीती ही पोलीस पाटलांना असते, ती तात्काळ पोलीस प्रशासनाला दिल्याने अवैध धंद्यावर कारवाई करणे सोपे जाते. त्यामुळे भविष्यातील निर्माण होणाऱ्या संघर्षाला वा गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यास उपयोग होतो. बरेचदा परप्रांतातुन गुन्हा करुन गुन्हेगार अगदी गावापर्यंत फरार होऊन लपण्यासाठी येतात व बिनबोभाट राहत असतात. पोलीस पाटील गावातच रहात असल्याने अशा स्वरुपाचे भाडेकरू म्हणुन राहत असलेल्या व्यक्तींचा तपास लावून बरेच गुन्ह्यांचा शोध लावण्यास प्रशासनास मदत करतो. पूर,भूकंप अतिवृष्टी या सारख्या नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत माहितीगार म्हणून  पोलिस पाटलांचा उपयोग होतोच त्याबरोबर जातीय धार्मिक तेढ, गुंडप्रवृत्ती,  या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस पाटील उपयोगी ठरले आहेत. गावच्या तंटामुक्त समितीचे निमंत्रक म्हणून देखील  पोलीस पाटील काम पाहतात.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here