पै. सुनील खामगळ यांचा वाढदिवस अनाठाई खर्च टाळून विविध सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा.

कौठळी येथील युवक सामाजिक कार्यकर्ते आणि कौठळी ग्रामपंचायत चे विद्यमान उपसरपंच पै. सुनील खामगळ यांचा वाढदिवस अनाठायी खर्च टाळून साजरा करण्यात आला. सुनील खामगळ यांनी स्वतःच्या स्वखर्चातून निमगाव केतकी येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन तेथील असलेले पेशंट यांना खाऊ देऊन सर्व प्रकारची फळे चादर वाटून साजरा केला. तसेच कौठळी येथे नूतन माध्यमिक विद्यालय कोठळी या विद्यालय मध्ये जाऊन इयत्ता दहावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तेथील विद्यार्थ्यांना त्यांनी फुटबॉल, बॅट, बॉल,शालेय कीट वाटप केले .यावेळी शाखेचे मुख्याध्यापक श्री नाळे सर व जाधव सर, भरणे सर ,बनसोडे सर, इंगळे सर ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया अध्यक्ष श्री हमा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा सरचिटणीस वसंत मारकड, कौठळी ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच श्री हिरामण मारकड, व विद्यमान संचालक श्री सुभाष पिसाळ, बापू मारकड, ज्ञानदेव मारकड, नितीन नरळे, शरद काळेल ,भारत काळेल , सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे पांडुरंग यमगर, जिगर खामगळ, तेजस खामगाव ,विशाल कांबळे ,आदी मान्यवर उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here