इंदापुर: काल शेटफळ हवेली तलाव बचाव कृती समितीने बावडा येथे शेतकरी मेळावा घेऊन शेटफळ हवेली तलावावरून मिळालेल्या 48 व जुन्या 17 अशा एकूण 65 पाणी परवानगीच्या विरोधात आक्रमक होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते या पाणी परवानग्या मिळण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी 6 ते 7 वर्ष शासनाशी पाठपुरावा करून या लोकांना पाणी परवानग्या देण्यासाठी प्रयत्न केला होता.
याबाबतीत शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे म्हणाले की,वास्तविक पहिली तर 9 गावातील शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी या 65 शेतकऱ्यांचा कधीच विरोध नाही, सर्वात महत्त्वाचे या 65 शेतकऱ्यांच्या पूर्वजांनी त्यांच्या जमिनी तलावासाठी,धरणासाठी व प्रकल्पासाठी दिलेल्या आहेत आणि याच शेतकऱ्यांच्या त्यागातून या तलावाची निर्मिती झालेली असताना या शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याला विरोध करणे हे एकप्रकारे दुर्दैवाची बाब आहे.
त्याचप्रमाणे नितीन शिंदे पुढे म्हणाले की सन 2019 साली शेटफळ हवेली तलावातून नवीन 48 नवीन उचल पाणी परवानगी देण्यात आल्या.म्हणजेच साधारण उचल पारवानगीला 2 वर्ष पूर्ण होत आहे,मंग 2 वर्षानंतर अचानक असे काय होते की आपणाकडून हा प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून व शासनाचे सर्व धोरणे व निकष पाळून या सर्व शेतकऱ्यांना उचल पाणी परवाना देण्यात आलेल्या आहेत या उचल पाणी परवाना देताना सर्व कागदपत्रे शासन दरबारी जमा आहेत हा परवाना एक दिवसात मिळालेला नसून या 65 शेतकऱ्यांनी 6 ते 7 वर्ष आपल्या चप्पला शासनाच्या उंबर्यावर झिजवल्या आहेत असे नितीन शिंदे म्हणाले.याबाबतीत येथील या 65 शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून घेतली असता त्यांचे म्हणणे असे आहे की,”आम्ही या गावचे भूमिपुत्र आहोत आणि आम्ही संविधानिक पद्धतीने व कायदेशीर मार्गाने या परवानग्या मिळवल्या आहेत आणि असे असताना आम्हालाच जर विरोध होत असेल तर आम्हीही जशास तसे उत्तर देवू” अशी या शेतकऱ्यांची भूमिका आहे.
वास्तविक 9 गावातील शेतकरी आणि हे एकूण 65 शेतकरी आपल्याच तालुक्यातील असून या दोन्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहणार आहे व कोणत्याच शेतकऱ्यावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही असे मत इंदापूर तालुका शिवसेना प्रमुख नितीन शिंदे यांनी आज व्यक्त केले . ========================================
जनता एक्सप्रेस मराठी न्युज ने या वादाच्या खोलात जाऊन यातून मार्ग कसा निघेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता असे निदर्शनास आले की,
1) सन 1997-98 साली ब्रिटिशकालीन शेटफळ हवेली तलावाचे नूतनीकरण झाले हे नूतनीकरण होत असताना 60 मीटरचे अजूनही काम अपूर्णच आहे. जर हे 60 मीटर चे काम झाले तर शेटफळ हवेली तलाव पूर्ण क्षमतेने भरता येईल व पाण्याची अडचण सुटेल.
2) शेटफळ हवेली तलावात पाणी सोडण्यासाठी असलेल्या कॅनल ची वहन क्षमता भवानीनगर पासून वाढवणे गरजेचे असून त्याची खोली वाढवली तर शेटफळ तलाव 45 दिवसा ऐवजी 15 दिवसातच पूर्ण क्षमतेने भरेल व याचा फायदा तालुक्यातील शेतकऱ्यांना होईल. 3) वरील प्रमाणे वहन क्षमता व तलावातील साठवण क्षमता वाढल्यानंतर वर्षभरातून दोन वेळा या तलावात पाणी सोडले तर भविष्यात कोणत्याच पद्धतीने पाणी कमी पडणार नाही.