इंदापूर: विधानसभेच्या अधिवेशनामुळे पडलेल्या छोट्याशा विश्रांतीनंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे पुन्हा एकदा फार्मात येणार असल्याचे दिसून येते. कारण शनिवार दि 26 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता जाचकवस्ती येथे विविध विकासकामांत अंतर्गत 1 कोटी 75 लाख रुपये कामाचे भूमिपूजन होणार असून जाचकवस्ती याच ठिकाणी जाहीर सभाही होणार आहे. या वेळी जन सुविधा अंतर्गत 40 लाख रुपये,दलित वस्ती सुधारणा 31 लाख रुपये,3054 योजना 80 लाख रुपये, रोजगार हमी योजना 24 लाख रुपये अशा पद्धतीच्या कामाची रूपरेषा असून या कामांच्या उद्घाटनाचे काम शनिवारी होणार आहे.त्याचप्रमाणे रविवार दिनांक 27 मार्च रोजी इंदापूर तालुक्यातील गिरवी व काटी येथे विविध विकासकामांचे उद्घाटन होणार आहेत व उद्घाटन झाल्यानंतर राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे दोन्ही ठिकाणी जाहीर सभा घेत आपली तोफ डागणार आहेत.याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवार दिनांक 27 मार्च रोजी दुपारी 1 वाजता गिरवी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले असून त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजता काटी येथेही जाहीर सभेचे आयोजन करीत तब्बल 20 कोटींची विकास कामे हाती घेण्यात आलेली असून त्यांचे भूमिपूजन व उद्घाटन केले जाणार आहे.यामध्ये काटी – रेडा – रेडणी रस्ता 3 कोटी वरकुटे- काटी नीरा भीमा कारखाना 6.11 कोटी काटी ओढ्यावरील पूल 1 कोटी व इतर विकास कामे तसेच गिरवी येथील 5.62 कोटींची विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन दत्तामामा भरणे राज्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम ,महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदिप दादा गारटकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे हे असणार आहेत .