पुणे पालखी महामार्गातील पर्यायी मार्ग रद्द होण्यासाठी शेतकर्‍यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू. शासन दिशाभूल करत आहेत याचे पुरावे केले स्पष्ट..

इंदापूर प्रतिनिधी :सचिन शिंदे.
निमगाव केतकी: पालखी महामार्गातील पर्यायी मार्ग रद्द होण्यासाठी शेतकर्‍यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू
चालू रस्त्याच्या दक्षिण बाजूने असणार्‍या जुन्या रस्त्यांचा विचार केलेला नाही. बाह्यवळण करू नये असा १५ ऑगस्ट २०१७ चा ग्रामसभेचा ठराव प्राधिकरणास सादर केलेला आहे. गुगल अर्थ नकाशानुसार रस्ता ३६०० मीटर लांबीचा दाखविला आहे व रिअलायमेंट रस्ता पंधराशे १५६० मीटर लांबीचा दाखवून दिशाभूल केलेले आहे.
 जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी महामार्ग क्रमांक ९६५ जी हा इंदापूर-बारामती राज्य महामार्ग पहिला १०० फुटी असताना निमगाव केतकी येथील शेतकऱ्यांच्या शेतातून नवीन मार्ग जात असून, हा परस्पर रिअलायमेंट (पर्यायी मार्ग) रद्द करण्यासाठी मार्ग बाधित शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि. १५) विजयादशमीच्या दिवसांपासून निमगावात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी केलेल्या मागण्यानुसार, प्राधिकरणाने चालू रस्ता शंभर फूट असताना देखील ७० फूट दाखवून दिशाभूल केली आहे.
चालू रस्त्याच्या दक्षिण बाजूने असणार्‍या जुन्या रस्त्यांचा विचार केलेला नाही. बाह्यवळण करू नये असा १५ ऑगस्ट २०१७ चा ग्रामसभेचा ठराव प्राधिकरणास सादर केलेला आहे. गुगल अर्थ नकाशानुसार रस्ता ३६०० मीटर लांबीचा दाखविला आहे व रिअलायमेंट रस्ता पंधराशे १५६० मीटर लांबीचा दाखवून दिशाभूल केलेले आहे. चालू रस्त्याचे अंदाजपत्रक ६४ कोटी ४ लाख रुपये व रिअलायमेंट रस्त्याचे ३९ कोटी ८२ लाख दाखवून दिशाभूल केली आहे.
प्राधिकरणाने २८ मार्च २०१८ रोजीच्या प्रत्यक्ष वस्तुस्थितीच्या अहवालामध्ये चालू रस्ता २० ते २५ मीटर रुंद दाखवून चुकीचा अहवाल पाठवलेला आहे. मोजणीच्या नोटिसा काढून दडपशाही केली जात आहे. यासाठी सक्षम प्राधिकारी तथा प्रांताधिकारी आणि ८ मार्च २०१८ रोजी बाधित होणाऱे शेतकरी, अल्प भूधारक व मध्यम भूधारक आहेत. चालू रस्त्यावर अंडरपास करावा असा स्वयस्पष्ट अहवाल दिलेला आहे.
प्राधिकरणाने अधिनियमातील तरतुदीचा भंग करून २७ मार्च २०१८ ची अधिसूचना कार्यवाही विना रद्द करून २७ जानेवारी २०२१ ची अधिसू्चना जारी करून दडपशाही चालवलेली आहे. तरी सक्षम प्राधिकारी यांनी १७ ऑगस्ट २०२१ च्या निकाल पत्रामध्ये सुनावणी दरम्यान मांडलेल्या मुद्द्यांचा खुलासा केला नाही. तसेच सदर निकाल पत्रामध्ये प्राधिकरणाने केलेला खुलासा तांत्रिकदृष्ट्या चुकीचा आहे हे निकालपत्र आम्हा शेतकऱ्यांना मान्य नाही. अशा पद्धतीचा मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत. त्या मान्य झाल्याशिवाय हे बेमुदत धरणे आंदोलन स्थगित करण्यात येणार नाही. जर लवकर यावर शासनाने पर्याय काढला नाहीतर आम्हाला पुढे आमरण उपोषण करण्याशिवाय मार्ग नाही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी सांगितले.यावेळी सर्जेराव जाधव, संदीप भोंग, तात्यासाहेब वडापुरे, बाबासाहेब भोंग, ॲड. सचिन राऊत, कुलदिप हेगडे, सचिन चिखले, मच्छिंद्र आदलिंग, भारत बरळ, अमोल राऊत, म्हसुदेव वडापुरे, नवनाथ आदलिंग यांच्यासह आदी शेतकरी मोठ्या संख्येने याधरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत.
दरम्यान, या बेमुदत धरणे आंदोलनास बहुजन परिषद महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष बिबीशन लोखंडे, कार्याध्यक्ष दत्ता बाबर तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष संजय राऊत यांनी भेट देऊन आंदोलनास आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.या आंदोलनास सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली व आंदोलकांच्या मागण्यांचे लेखी निवेदन स्वीकारत योग्य तो निर्णय घेऊ अन्याय केला जाणार नाही, असे आश्वासित केले.


निमगावकरांनी पालखी मार्गाबाबत केल्या भावना व्यक्त,पहा खालील लिंकद्वारे व्हिडिओ पहा 👇👇👇

https://youtu.be/p_fIAmzVT4Q

 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here