पुणे जिल्हा सहकारी बँक मध्ये सहा जण बिनविरोध,तर इंदापूरच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष.

इंदापूर: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आज उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली, यामध्ये बारामतीमधून अजित अनंतराव पवार,आंबेगाव मधून दिलीप दत्तात्रय वळसे,पुरंदर मधून संजय चंद्रकांत जगताप,मावळ मतदार संघातून ज्ञानोबा सावळेराम दाभाडे,भोर तालुक्यातून संग्राम अनंतराव थोपटे,वेल्हे मतदार संघातून रेवणनाथ कृष्णाजी दारवटकर,हे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.शिरूर मधून आमदार अशोक रावसाहेब पवार ,दौंड मधून बँकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश किसनराव थोरात, खेड मधून दिलीप दत्तात्रय मोहिते ,जुन्नर मधून संजय शिवाजीराव काळे,मुळशी मतदार संघातून सुनील काशिनाथ चांदेरे, इंदापूर मतदार संघातून रणजीत बाबुराव निंबाळकर यांची नावे जाहीर केली असून हवेली मतदार संघामध्ये कोणाचेही नाव जाहीर न करता मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.मतदारसंघातून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे क वर्ग मतदार संघातून हवेली तालुक्यातून सुरेश मारुती घुले, ड वर्ग मतदारसंघातून पुरंदर मधून दिगंबर गणपत दुर्गाडे ,अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून हवेली चे प्रवीण बाजीराव शिंदे ,विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून बारामती मधून दत्‍तात्रेय महादेव येळे,इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून बारामतीमधून संभाजी नारायण होळकर,महिला प्रतिनिधी मतदारसंघातून जुन्नर मधून पूजा संभाजी बुट्टे पाटील, वेल्हे मतदारसंघातून निर्मला कृष्णा जागडे, यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे .पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत उपमुख्यमंत्री अजित पवार,आमदार संजय जगताप, रेवन नाथ दारवटकर ,माऊली दाभाडे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील,आमदार संग्राम थोपटे हे सहाजन बिनविरोध निवडून आले आहेत.उर्वरित मतदारसंघातील सात जागी लढत होणार असून अनुसूचित जाती जमाती इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व महिला प्रवर्गातील उमेदवारांच्या लढती होणार आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेसने आज जाहीर केले आहे.पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत लक्षवेधी ठरणार आहे ती इंदापूरची लढत ,या ठिकाणी विद्यमान संचालक अप्पासाहेब जगदाळे हे भाजप कडून निवडणूक लढवत आहेत.त्यांचा सामना छत्रपती चे संचालक रणजीत बाबुराव निंबाळकर यांच्याशी होणार आहे. रणजीत निंबाळकर यांच्यासाठी राष्ट्रवादीने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर आप्पासाहेब जगदाळे यांचाही तगडा संपर्क असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here