पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बिनविरोध निवडून आल्याबद्दल कर्मयोगी चे संचालक शांतीलाल शिंदे यांनी केला आप्पासाहेबांचा सत्कार.

इंदापूर तालुका प्रतिनिधी: संतोष तावरे
इंदापूर: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बिनविरोध म्हणून अप्पासाहेब जगदाळे यांची सलग चौथ्यांदा निवड झाल्यामुळे सर्वच स्तरातून आप्पासाहेबांवर प्रेम करणारे त्यांच्या जवळच्या लोकांनी आप्पासाहेब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे. काहींनी फोनद्वारे,व्हाट्सअप द्वारे तर काहींनी भेटून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.अप्पासाहेब यांचा प्रदीर्घ व दांडगा अनुभव व संघटन कौशल्य या असणाऱ्या पैलूमुळे अप्पासाहेब जगदाळे यांचे पारडे कोणत्याही निवडणुकीत जडच असते.अप्पासाहेब जगदाळे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल अवसरी गावचे त्यांचे जवळचे कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री शांतीलाल शिंदे आणि समाजकार्य करणारे दत्तात्रय मगर यांनी काल अप्पासाहेब यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नुकत्याच कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या बिनविरोध झालेल्या निवडणुकीत अवसरी गावचे श्री शांतीलाल शिंदे यांची कर्मयोगाचे संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. शांतीलाल शिंदे यांचाही मोठा रांगडा जनसंपर्क असल्यामुळे त्यांनी कोणाचीही जातपात न बघता सामान्य माणसांना कोणत्याही गोष्टीसाठी त्यांचे खूप सहकार्य लाभते, आणि त्यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वामुळेच त्यांचीही कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली. आप्पासाहेब यांनीही ही कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री शांतीलाल शिंदे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here