इंदापूर: आज कै.मंगेशराव (बाबा )पाटील प्रतिष्ठाण आणि पतंजली योग समिती इंदापूर यांचे वतीने संगीतमय योग दिवाळी पहाट कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ व २ इंदापूर नगरपरिषद येथे आयोजित करण्यात आलेला होता.पहाटेच्या रम्य वातावरणात गुलाबी थंडीमध्ये योगासने, प्राणायाम आणि शारदा स्वरांजली प्रस्तुत सुरेल गायनाची मैफिल समोर मनमोहक रांगोळी आणि त्यावर दिव्यांची रोषणाई अशा वातावरणामध्ये दिवाळी पहाट हा कार्यक्रम संपन्न झाला.आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला काहीतरी व्याधी त्रास देत आहे प्रत्येकाला यातून मुक्ती हवी आहे म्हणून पतंजली परिवार गेले अनेक वर्ष मोफत योग वर्ग चालवतआहे. या कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन जी पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पार लाभली होती. यावेळी हर्षल पाटील म्हणाले की”इंदापूर शहरात हा आयोजित केलेला संगीतमय योगाची दिवाळी पहाट हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य असून त्यांनी या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला देश पातळीवरती महत्त्व वाढवले आहे.भविष्यामध्ये वय वर्ष 18 ते 35 या वयोगटातील तरुणांनी योग साधना केली पाहिजे व येणारी पिढी बौद्धिकदृष्ट्या तसेच शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त व्हावी या हेतूने इंदापूर शहरांमध्ये भव्य असे योग भवन बांधण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील व तालुक्यातील विद्यार्थी विद्यार्थिनींना योग करता येतील” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.यावेळी निमंत्रक माजी नगरसेवक शेखर भैय्या पाटील, भारत स्वाभिमान ट्रस्टचे इंदापूर तालुका अध्यक्ष जयकुमार शिंदे, पतंजली योग समिती इंदापूर तालुका अध्यक्ष मल्हारी घाडगे,युवा भारत राज्य कमिटी सदस्य प्रशांत गिड्डे,महिला पतंजली योग समिती अध्यक्ष सायरा भाभी आत्तार तसेच इंदापूर शहरातील माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक कृष्णा ताटे डॉ.ऋषिकेश गार्डे मा.सरपंच गोपीचंद गलांडे शिवसेना शहर प्रमुख मेजर सोमवंशी अॅड. बसले वकील ऍड.मयूर शिंदे सागर गानबोटे दत्तू पांढरे निलेश शिंदे नितीन मस्के निलेश बोरा अभिजीत पाटील विकास बलदोटा सुहास बलदोटा तसेच पतंजली परिवारातील सर्व योगशिक्षक योग साधक योगसाधिका तसेच इंदापूर शहरातील नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र परबत यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी योगगुरू सचिन पवार यांची अवघ्या एक वर्षाच्या जिजा उर्फ जिजाऊ या चिमुकलीने आपल्या अंगाची लवचिकता दाखवत हर्षवर्धन पाटील यांचे लक्ष वेधले. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी त्या चिमुकली जवळ घेऊन मांडीवर बसवले व स्तुती केली.