माढा तालुका डॉक्टर्स असोसिएशन आयोजित पावनखिंड रन २०२३ ही स्पर्धा नुकतीच टेंभुर्णी मध्ये बहुसंख्य स्पर्धकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये महिला गटात इंदापूर तालुक्यातील परिणीता गोविंद शेंडे वरकुटे खुर्द या मुलीने ४६ मिनिटांमध्ये १० किलोमीटर अंतर पार करून प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे इंदापूरकरांचाही मान तिने तिथे उंचवल्यामुळे परिणीताचे सर्व स्तरातून विशेष कौतुक केले जात आहे. इंदापूर तालुक्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे तिचे ठीक ठिकाणी कौतुक करून सत्कारही केले जात आहेत. धावण्याच्या स्पर्धेला सगळीकडेच मॅरेथॉन असे म्हटले जाते, परंतु या स्पर्धेला पावनखिंड स्पर्धा हे नाव देण्याच्या पाठीमागे आयोजकांच्या संकल्पनेला अनेकांनी उचलून धरले, पावनखिंड नाव दिल्यामुळे सर्वांनी याचे कौतुक देखील केले. भारतामध्ये धावण्याच्या इतिहास तर खूप मोठा आहे. पावनखिंड मध्ये बाजीप्रभू देशपांडे यांनी प्रचंड मोठी दौड लावत महाराजांना सुरक्षित स्थळी किल्ल्यावर पोहोचवले, त्यामुळे पावनखिंड प्रसिद्ध झाले, त्यामुळे मॅरेथॉनच्या ऐवजी पावनखिंड असे का म्हणू नये हा विचार डॉक्टर असोसिएशन ने उचलून धरला आणि यापुढे मॅरेथॉन नाही तर पावनखिंड स्पर्धा असे नाव घेण्याचे ठरवले .या स्पर्धेचे नियोजन अतिशय सुंदर आयोजकांनी केले होते आणि याच स्पर्धेमध्ये आपल्या इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील वरकुटे खुर्द येथील परिणीता गोविंद शेंडे हिने आपल्या धावण्याच्या कौशल्याने महिला गटात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल जनता एक्सप्रेस मराठी न्यूज कडून तिला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.