पालघर जिल्हात सहा ग्रामपंचायतीवर कोळी महासंघ पुरस्कृत सरपंच.

पालघर जिल्हा प्रतिनिधी: वैभव पाटील
दि.२९/१०/२०२२ रोजी झालेल्या उपसरपंच निवडणुकीत कोळी महासंघाचे जिल्ह्यात एकूण ४ उपसरपंच निवडून आले आहेत या ग्रामपंचायती मध्ये दि.१७/१०/२०२२ रोजी लागलेल्या ग्रामपंचायत निकालात कोळी महासंघच्या उमेदवारांना जनतेने स्पष्ट व भरघोस यश दिले आहे.
पालघर जिल्ह्यातील एकूण 6 ग्रामपंचायत मध्ये कोळी महासंघ पुरस्कृत सरपंच व सुमारे २६ ग्रामपंचायती मध्ये कोळी महासंघ आणि समाज उन्नती संघटनाने उमेदवार निवडून आणले आहेत.
यात मोखाडा,जव्हार,विक्रमगड, पालघर,डहाणू,तलासरी या तालुक्यातील बेरिस्ते कारेगाव,कष्टी,सावर्डे,गोंघर ,इडवन,वशिंड ,मोरहांदा ,सूर्यमाला,दाभलोन,बिरार्थन,बुद्रुक,नवघर इत्यादी ग्रामपंचायती आहेत.हे सर्व निवड झालेले उमेदवार सुशिक्षित,तरुण,गावासाठी काही करू इच्छिणारे राजकीय पार्श्भूमी नसणारे पण समाज कार्याशी व मातीशी नाळ जोडलेले आहेत तसेंच पारदर्शक ग्रामपंचायत चालवून गावाचा विकास करतील असा निर्धार संघटनेच्या कार्यकर्त्याचा आहे.सर्व उमेदवार व सरपंच रमेश दादा पाटील आमदार विधान परिषद, ॲड.चेतन दादा पाटील युवा प्रदेश अध्यक्ष कोळी महासंघ,प्रदेश अध्यक्ष भाजपा मच्छीमार सेल तन्मय साखरे, रामदास लहारे,सरपंच सुदाम उंबरसाडा, सरपंच देविदास निसाळ,सरपंच हीरामल मवळे,उपसरपंच शिवराम हामरे,उपसरपंच योगेश लाश्या निकुळे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्व मध्ये निवडून आले आहेत तसेच कार्याध्यक्ष धनंजय मेहेर,गौतम वर्तक,कोलम जोशी,पुष्पा पाटील,सुशील ओगले, भावेश मनिवडे,मुरलीधर कडू यांनी मार्गदर्शन व मेहनत घेतली आहे.ज्या गावात गावकऱ्यांनी गावात बदल घडवण्यासाठी व पक्ष व जाती भेद चे राजकारण दूर करण्यासाठी गावाचे पॅनल उभे केले होते अश्या सर्वांना या संघटनेचा पाठिंबा असेल तसेच जिल्ह्यातील तरुण पिढी कोळी महासंघ कडे आकर्षित होत आहे असे तन्मय साखरे यांनी माहिती दिली .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here